03/09/2026
पद्मश्री आदरणीय श्री. गिरीशकाका प्रभुणे हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नसून, पिंपरी-चिंचवड शहराचे खरे भूषण आहेत. गेली अनेक दशके त्यांनी समाजातील उपेक्षित, वंचित आणि आदिवासी बांधवांच्या उन्नतीसाठी अथक व निरपेक्ष कार्य केले आहे. क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या राष्ट्रभक्ती आणि समाजसेवेच्या विचारांचा वारसा पुढे नेत, क्रांतिवीर चापेकर समितीच्या माध्यमातून चालवले जाणारे क्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय आणि पुनरुत्थान समरसता गुरुकुलम अनुदानित आदिवासी आश्रमशाळा, चिंचवड-पुणे ही त्यांच्या या तपस्येची जिवंत उदाहरणे आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण आणि संस्कार पोहोचवण्याचे त्यांचे कार्य नेहमीच वंदनीय राहिले आहे.
आज पद्मश्री गिरीशकाका प्रभुणे यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या समवेत झालेली ही भेट प्रेरणादायी आणि भावनिकदृष्ट्या समाधान देणारी ठरली. आता एक नवा, ऐतिहासिक अध्याय जोडला जाणार आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील मागासवंचित आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मौजे मोशी, ता. हवेली, जि. पुणे येथील गट नं. ३२७ मधील तब्बल २५ हेक्टर शासकीय जमीन आदिवासी विकास केंद्र उभारण्यासाठी देण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. भारतातील पहिले आदिवासी विकास केंद्र म्हणून हा प्रकल्प उभा राहणार आहे, ही पिंपरी-चिंचवडकरांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
ही जमीन महसूलमुक्त व भोगवटामूल्यरहित किमतीने कब्जेहक्काने प्रदान करण्यात येणार असून, या ठिकाणी आदिवासी समाजासाठी शिक्षण, निवासी सुविधा, कौशल्य प्रशिक्षण, रोजगाराभिमुख उपक्रम, सामाजिक पुनर्वसन तसेच सांस्कृतिक जतनासाठी व्यापक स्वरूपाचे विकास केंद्र उभारले जाणार आहे. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सुरक्षित निवासी सुविधा, युवकांना कौशल्यविकासाच्या नव्या संधी आणि कुटुंबांना स्वावलंबनाच्या नव्या वाटा उपलब्ध होणार आहेत.
मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारचे या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मन:पूर्वक आभार. गिरीशकाका प्रभुणे यांच्या नेतृत्वाखाली मोशी येथे उभारले जाणारे हे केंद्र भविष्यात पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी एक महत्त्वाचे मॉडेल ठरेल, यात शंका नाही.
वंचित, शोषित घटकांच्या हिताचा विचार, म्हणजे ‘‘भाजपा महायुती‘‘ सरकार..!
Devendra Fadnavis Ravindra Chavan BJP Maharashtra