14/07/2026
सायकल मित्र ग्रुपच्या वतीने पुणे ते पंढरपूर सायकल वारी..!
मोशीतील सायकल मित्र ग्रुपच्या वतीने हरित वारी–निर्मळ वारीचा संदेश देत पुणे ते पंढरपूर सायकल वारी उत्साहात रवाना झाली. श्रद्धा, सेवा, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात शेकडो सायकलपटू सहभागी झाले आहेत. इंद्रायणी नदी स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि वारकरी परंपरेचे जतन या त्रिसूत्रीवर आधारित हा उपक्रम नागरिकांकडूनही कौतुकास्पद ठरत आहे.
#सायकलवारी #हरितवारीनिर्मळवारी #पुणेतेपंढरपूर #पंढरीचीवारी #वारकरीसंप्रदाय #विठ्ठलनामाचा_गजर #स्वच्छभारत