13/09/2022
*बीड पोलीस व फुटबॉल असोसिएशन यांचा मैत्री सामना*
आज दिनांक 13/09/22 मंगळवार रोजी *बीड पोलीस विरुद्ध बीड जिल्हा फुटबॉल असोसिएशन* असा फुटबॉल चा मैत्री सामना पोलीस मुख्यालय बीड येथे खेळवण्यात आला, या प्रसंगी विशेष उपस्थिती *मा. अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार सर* यांची होती. त्यांनी सर्व खेळाडू यांना उत्तम खेळासाठी प्रोत्साहीत केले, सदर सामना 1-1असा बरोबरीने संपला. सामना च्या वेळी मुहम्मद हनिफ सर (गेम इंचार्ज-बाबर), रा.पो.उप.नि लाला सर, मोमीन मोहसीन (जिल्हा संयोजक-जिल्हा फुटबॉल असोसिएशन बीड) जफर सय्यद (पंच) व इतर पोलीस खेळाडू उपस्थित होते.