BN7 News

BN7 News NEWS MEDIA BN7 NEWS

श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती संस्थेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण स...
06/08/2026

श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती

संस्थेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

बेळगाव - श्रीभक्ती महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने विश्वासाच्या जोरावर आपली घौडदौड सतत चालू ठेवली आहे.सभासदांच्या हिताचा विचार करून संस्थेने नवी गोल्ड लोन सेवा सुरू केली आहे, अशी माहिती सोसायटीच्या अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांनी आज रविवारी पार पडलेल्या 28 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना दिली.

न्यु गुडशेड रोड येथील श्रीमाता सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत पुढे बोलताना ज्योती अग्रवाल म्हणाल्या, आजच्या काळात सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत.अशावेळी सर्वसामान्यांना दागिने खरेदी करणे अवघड होऊन बसले आहे. याचा विचार करून आमच्या संस्थेने सभासदांना अत्यंत लाभदायी अशी गोल्ड लोन योजना सुरू केली आहे.सभासदांच्या आर्थिक स्थितीचा विचार करून कर्ज करून कर्ज वितरण, वेळेत थकबाकी वसुली आणि पारदर्शक सेवा यावर भर देत संस्थेने प्रगतीची वाटचाल चालविली आहे. यावर्षी संस्थेला 29 लाख 78 हजार 610 रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले.

संस्थेच्या संचालिका श्वेता देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत करुन संस्थेच्या कार्याची माहिती देताना म्हणाल्या, सचोटीच्या कारभारामुळे संस्थेला नेहमी अ वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल 66.83 कोटींवर पोहोचली आहे. संस्थेकडे 28.87 कोटींचे खेळते भांडवल असल्याची माहिती देतानाच देसाई यांनी अहवाल वाचन करून, नफा तोटा पत्रक, ताळेबंद सादर केला. यावेळी सभेसमोर मांडण्यात आलेल्या सर्व विषयांना मोठ्या संख्येने उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. सोसायटीचे मॅनेजर अतुल कुलकर्णी यांनी मागील वर्षाचा सर्वसाधारण सभेचा वृत्तांत सादर केला.

यावेळी व्यासपीठावर संचालिका वंदना चव्हाण, शोभा किल्लेकर, कल्पना देसाई,ज्योती पाटील, श्रद्धा रेवणकर उपस्थित होते.सभेच्या शेवटी श्रद्धा रेवणकर यांनी सर्वांचे आभार मानले.सर्वसाधारण सभा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी संस्थेचे रिकव्हरी ऑफिसर सुनील पाटील यांच्यासह सर्व कार्यकारी वर्गाने विशेष प्रयत्न केले.

होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?बेळगाव : बेळगाव तालुक्यातील होन्निहाळ गावात 2019 म...
02/08/2026

होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील होन्निहाळ गावात 2019 मध्ये पूर्ववैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणात 7 आरोपींना दोषी ठरविण्यात आले आहे. खटल्याच्या सुनावणीदरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाल्याने उर्वरित 6 दोषींना 6 ऑगस्ट 2026 रोजी तिसऱ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
या खटल्यातील महेश रणधीर रामचंद्र मुरारी यांचा मृत्यू झाला असून आता उर्वरित यल्लेशी महादेव तानुगोळ, राघवेंद्र तुकाराम कम्मार, विशाल विठ्ठल हुदली, किरण मल्लेशी मिसाळे, चेतन विजय कवडी, राघवेंद्र अदृश्यप्पा दानप्पा यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2019 रोजी होन्निहाळ येथील मनियार लेआउटमध्ये पूर्ववैमनस्यातून वाद झाला होता. या वादानंतर सात आरोपींनी मिळून नागेंद्र बसाप्पा मेकलगोल (रा. सुळेभावी) यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
जीव वाचवण्यासाठी नागेंद्र यांनी जवळील एका शेडमध्ये जाऊन आतून दरवाजा बंद केला. मात्र, आरोपींनी शेडचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि तलवार तसेच इतर धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात नागेंद्र यांचा जागीच मृत्यू झाला होता.
घटनेनंतर मारीहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे वकील आर. जी. देवरेड्डी यांनी बाजू मांडली.

किरण जाधव यांनी केले लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रनिर्मितीतील अमूल्य योगदानाचे स्मरणलोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण...
02/08/2026

किरण जाधव यांनी केले लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रनिर्मितीतील अमूल्य योगदानाचे स्मरण

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त टिळक चौक येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते किरण जाधव यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.

किरण जाधव यांनी यावेळी बोलताना, लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रनिर्मितीतील अमूल्य योगदानाचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा लोकमान्य टिळकांचा प्रेरणादायी संदेश आजही प्रत्येक भारतीयाला राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि देशसेवेची प्रेरणा देत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून समाजात राष्ट्रीय एकात्मता निर्माण केली तसेच केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांतून ब्रिटिश सत्तेविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवून स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

याप्रसंगी राजन जाधव तसेच टिळक चौक रिक्षा अध्यक्ष आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

संत मीरा शाळेत केला गेला गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात...
02/08/2026

संत मीरा शाळेत केला गेला गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार

बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात संत मीरा शाळेच्या गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला चिन्मय मिशनच्या स्वामिनी प्रज्ञानंदजी, डॉ जयतीर्थ कुलकर्णी, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, मुख्याध्यापिका सुजाता दप्तदार आदी मान्यवर उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते ओंकार सरस्वती, भारत माता फोटो पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गुरु स्तोत्रचे पठण केले. याप्रसंगी शाळेचे विद्यार्थीनी संभवी स्वामी, मानवी चिंचवडकर यांनी गुरुचे महत्व सांगितले तर श्राव्या भट्ट हिने गीत गायले.
यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 2026 शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पूर्वी शेट्टी, श्रावणी मोरे, भक्ती कुंभार, सहना सोलंकर, मनाली जुवेकर, सायना मजुकर आकांक्षा बोकमुरकर, स्नेहा धनवडे, वर्षा परीट, सर्वेश तेवरे, श्रावणी मेरवा
या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आठवी व नवव्या इयतेच्या परिक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले.
2025- 26 सालाच्या आदर्श शिक्षिका म्हणून शामल दड्डीकर व माया निलजकर यांचा गौरव करण्यात आला. तसेच शाळेच्या शिपाई सुरेखा शहापूरकर, ज्योती अनिगोळ यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शाळा सुधारणा समिती सदस्य रजनी गुर्जर, माधव पुणेकर, किशोर काकडे, नीता अनगोळकर, मयूर कुलकर्णी, संतोष देशपांडे, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव व शिक्षक वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पावसकर, सविता पाटणकर, रूपाली जोशी यांनी तर सुजाता पाटील यांनी आभार मानले. शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

02/08/2026

समाजसेवक यल्लुपा पाटील यांचे कौतुकास्पद सेवाकार्य : नागरिकांतून होतंय समाधान व्यक्त

येळळूर : येथील चांगळेश्वरीनगर परिसरातील मुख्य रस्त्यावर येळळूर ग्रामपंचायतीच्या वतीने भराव टाकण्यात आला होता. पण रस्त्याचे काम पूर्ण झाले नव्हते. याची दखल घेत या भागातील सामाजिक कार्यकर्ते यल्लूपा पाटील यांनी उर्वरित रस्त्यावर भराव टाकून रस्त्याचे काम पूर्ण केले. त्याबद्दल या भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
चांगळेश्वरीनगरचा झपाट्याने विस्तार होत असून येथील मुख्य रस्ता अनेक दिवसांपासून खड्डेमय झाला होता. या रस्त्याचा वापर परिसरातील नागरिकांसह शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. तसेच मच्छे, झाडशहापूर आणि इतर गावांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम : संध्या किरण सेवा केंद्राने केले होते आयोजनबेळगाव: बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्य...
02/08/2026

ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम : संध्या किरण सेवा केंद्राने केले होते आयोजन

बेळगाव: बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, कार्यवाह सुरेंद्र देसाई , सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते.
यावेळी किशोर काकडे यांनी, रेल्वेतून फेकल्या गेलेल्या अरूणिमा सिन्हा यांनी परिस्थितीशी झुंज देत देशासमोर एक उदाहरण घालून दिले याची कथा सादर केली.
पांडूरंग कारकल यांनी प्रार्थना सादर केली तर रविंद्रनाथ व स्नेहलता जुवळी, अश्विनी पाटील, नारायण कोरडे, सुरेंद्र व योगिनी देसाई अशोक कदम, विजय वाइंगडे , सतिश देशपांडे, औदुंबर शेट्ये, हरेश जाधव, अरविंद मुतकेकर, अशोक लोकूर, अरूण धोत्रे, श्रेयस चौगुले, वनिता जोशी, सोनिया सरोदे व शोभा हतरकी यांनी मराठी, हिंदी व कन्नड गाणी सादर केली. विठ्ठल पोळ यांनी आभार मानले.

डॉ. राजश्री तुडयेकर यांच्याकडून पंडित नेहरू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना टी-शर्ट व पँटचे वाटपबेळगाव :  समाजसेविका आणि रॉ...
17/07/2026

डॉ. राजश्री तुडयेकर यांच्याकडून पंडित नेहरू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना टी-शर्ट व पँटचे वाटप

बेळगाव : समाजसेविका आणि रॉयल राज गोल्डन प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापिका व यशस्वी उद्योजिका डॉ. राजश्री तुडयेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत पंडित नेहरू हायस्कूल, शहापूर येथील 174 विद्यार्थ्यांना मोफत टी-शर्ट व पँटचे वाटप केले.
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मकता निर्माण व्हावी तसेच सर्व विद्यार्थ्यांमध्ये समानतेची भावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागतगीताने, तसेच दीपप्रज्वलन व फोटोपूजनाने झाली. या कार्यक्रमाप्रसंगी पाहुण्याची ओळख विनायक कंग्राळकर यांनी करून दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष श्री. विजयराव नंदिळळी सर उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम. बी. मुघळी यांच्यासह प्रवीण तेजम,मंजुनाथ पुजार, शशिकांत कपूर, प्रशांत पवार, गजानन कदम, युवराज पाटील, पवन, प्रदीप सुतार, विजय खवरे तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. राजश्री तुडयेकर यांनी, विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगत मन लावून अभ्यास करण्याचे, शिस्तीचे पालन करण्याचे आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे प्रोत्साहन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शून्यातून एखादी व्यक्ती कशी यशस्वी होऊ शकते याचे उदाहरणही दिले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टी-शर्ट व पँटचे वितरण करण्यात आले.
शाळा व्यवस्थापनाने डॉ. राजश्री तुडयेकर व राजेश तुडयेकर तसेच त्यांच्या ग्रुपचे या समाजोपयोगी व प्रेरणादायी उपक्रमाबद्दल आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुषमा पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. विजया पाटील यांनी केले.

पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. प्रभाकर कोरे यांचा मान्यवरांकडून सत्कारबेळगाव : शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सेवा क्षेत्रातील...
17/07/2026

पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. प्रभाकर कोरे यांचा मान्यवरांकडून सत्कार

बेळगाव : शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. प्रभाकर कोरे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. कोरे यांनी केएलई संस्थेच्या 110 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा आढावा घेतला. संस्थेची स्थापना झाली तेव्हा आर्थिक साधनसामग्री, स्वतःची इमारत किंवा आवश्यक सुविधा उपलब्ध नव्हत्या. मात्र, ग्रामीण आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, या संस्थापक ‘सप्तर्षी’ंच्या दृढ संकल्पामुळे संस्थेची भक्कम पायाभरणी झाली, असे त्यांनी सांगितले.
संस्थापकांच्या त्याग, परिश्रम आणि दूरदृष्टीमुळे आज केएलई संस्था शेकडो शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि संशोधन केंद्रांचे जाळे उभारण्यात यशस्वी ठरली आहे. हा सन्मान केवळ माझा नसून संस्थापक, व्यवस्थापन मंडळ, शिक्षक, डॉक्टर, कर्मचारी आणि जनतेच्या सहकार्याचे फळ आहे, असे डॉ. कोरे यांनी नमूद केले.
शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असून दर्जेदार आरोग्यसेवा प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे हेच संस्थेचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अविनाश पोतदार, शिरीष गोगटे यांच्यासह अन्य मान्यवरांनी डॉ. कोरे यांच्या नेतृत्वगुणांचे, शिस्तप्रियतेचे, दूरदृष्टीचे आणि समाजाभिमुख कार्याचे कौतुक केले. “फुलांचा सुगंध वाऱ्याच्या दिशेने पसरतो, परंतु चांगल्या व्यक्तीच्या कार्याचा सुगंध सर्व दिशांना पोहोचतो. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. प्रभाकर कोरे,” असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले.
कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि डॉ. कोरे यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

90 फूट खोल विहिरीत पडलेल्या युवकाचा अग्निशामक दलाच्या जवानांनी वाचविला जीवचिक्कोडी : तालुक्यातील नागरमुन्नोळी गावात 90 फ...
17/07/2026

90 फूट खोल विहिरीत पडलेल्या युवकाचा अग्निशामक दलाच्या जवानांनी वाचविला जीव

चिक्कोडी : तालुक्यातील नागरमुन्नोळी गावात 90 फूट खोल उघड्या विहिरीत पडलेल्या युवकाला अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूपपणे बाहेर काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, नागरमुन्नोळी येथील रहिवासी श्रीधर मराई (वय 24) हे रात्रीच्या वेळी चुकून पाय घसरून 90 फूट खोल उघड्या विहिरीत पडले. युवक विहिरीत पडल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी तत्काळ चिक्कोडी अग्निशामक केंद्राला माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच चिक्कोडी अग्निशामक दलाचे जवान अत्याधुनिक सुरक्षा साहित्यांसह घटनास्थळी दाखल झाले. अंधारात आणि आव्हानात्मक परिस्थितीत जवानांनी सुमारे 90 फूट खोल विहिरीत उतरून युवकाला सुरक्षितपणे बाहेर काढले.
बचाव करण्यात आलेल्या श्रीधर यांना प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी चिक्कोडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

बायपास रस्त्यासाठी जमीन संपादन :  शेतकऱ्यांना अधिक मोबदला देण्याची रयत संघटनेची मागणीचिकोडी : चिकोडी शहराच्या हळट्टी हद्...
17/07/2026

बायपास रस्त्यासाठी जमीन संपादन : शेतकऱ्यांना अधिक मोबदला देण्याची रयत संघटनेची मागणी

चिकोडी : चिकोडी शहराच्या हळट्टी हद्दीत राष्ट्रीय महामार्गावरील बायपास रस्त्याच्या बांधकामासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमीन व मालमत्तेला योग्य मोबदला द्यावा, या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेनेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी चिकोडी तहसीलदार राजेश बुरळी यांना निवेदन सादर केले.
हळट्टी परिसरातील राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण व बायपास रस्त्यासाठी जमीन संपादन प्रक्रिया सुरू असून, संपादन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना प्रति गुंठा केवळ 85 हजार रुपये मोबदला देण्यात येणार असल्याची नोटीस दिली आहे. मात्र, सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत ही रक्कम अत्यंत कमी असून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे हळट्टी गावातील शेकडो शेतकऱ्यांनी प्रति गुंठा किमान 10 लाख रुपये मोबदला देण्याची मागणी केली आहे.
यावेळी बोलताना रयत संघाचे तालुका अध्यक्ष मनोज मनगुळी आणि शेतकरी नेते मल्लेश लिंबिगिदादा यांनी सांगितले की, विकासकामांसाठी शेतकरी आपली सुपीक जमीन देत आहेत. अशा परिस्थितीत जमीन संपादन अधिकारी योग्य मोबदला न देता शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. हळट्टी येथील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा तातडीने विचार करून वाढीव मोबदला द्यावा.
शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या मान्य न झाल्यास नेते चुन्नप्पा पुजेरी आणि शशिकांत गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी रमेश चन्नावर, संजू चन्नावर, भरत जुगुळे, महादेव पुजेरी, लगमण्णा पुजेरी, अप्पासाहेब पुजेरी, धनपाल धामणवर, गजानन धामणवर, सदाशिव दोड्डमणी यांच्यासह हळट्टी गावातील शेकडो शेतकरी व हसिरू सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Address

Shahapur
Belgaum

Alerts

Be the first to know and let us send you an email when BN7 News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to BN7 News:

Shortcuts

Share