कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई

  • Home
  • India
  • Ambajogai
  • कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई

कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई Krishi Vigyan Kendra (KVK) is a frontline agricultural extension center dedicated to assessment, refinement, and demonstration of agricultural technologies.

Dedicated to farmers’ growth through modern agriculture, skill development & innovation.
आधुनिक शेती, कौशल्य विकास आणि नवकल्पनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी समर्पित. We provide training, advisory services, and field demonstrations to farmers, rural youth, and farm women for improving productivity and livelihoods.

कृषि विज्ञान केंद्र हे कृषी तंत्रज्ञानाचे मूल्यांकन, सुधारणा आणि प्रात्य

क्षिके करण्यासाठी कार्यरत अग्रगण्य विस्तार केंद्र आहे. शेतकरी, ग्रामीण युवक व महिला यांना उत्पादनक्षमता आणि उत्पन्न वाढीसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन व प्रात्यक्षिके दिली जातात.

🌼🙏 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌾🙏शेतकरी बांधवांनो,आपल्या भारतीय संस्कृतीत भूमाता, निसर्ग आणि शेती हेच आपले खरे गु...
29/07/2026

🌼🙏 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌾🙏

शेतकरी बांधवांनो,

आपल्या भारतीय संस्कृतीत भूमाता, निसर्ग आणि शेती हेच आपले खरे गुरु आहेत. माती आपल्याला संयम शिकवते, निसर्ग आपल्याला संतुलन शिकवतो आणि शेती आपल्याला कष्ट, जिद्द व आत्मनिर्भरतेचा अमूल्य धडा देते.

या पावन गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वांनी आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया आणि विज्ञानाधारित, शाश्वत व निसर्गपूरक शेतीचा संकल्प करूया.

सद्गुरूंची कृपा, उत्तम आरोग्य, भरघोस पीक आणि समृद्धी आपल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या जीवनात नांदो, हीच सदिच्छा!

🌾 आपणास व आपल्या परिवारास गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼🙏

#गुरुपौर्णिमा #शेतकरी #कृषी #समृद्धशेतकरी #जयजवानजयकिसान

Deendayal Research Institute Indian Council of Agricultural Research Icaratari Pune Shivraj Singh Chouhan CMOMaharashtra PMO India Kvk Majhgawan Satna Kvk Dri Gonda Krishi Vigyan Kendra, Ganiwan Collector Office Beed - जिल्हाधिकारी कार्यालय बीड

🌱🌾 मूग-उडीद उत्पादक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना! 🌾🌱कृषी विभागाच्या खरीप हंगामातील मूग व उडीद पीक स्पर्धेत सहभागी...
29/07/2026

🌱🌾 मूग-उडीद उत्पादक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना! 🌾🌱

कृषी विभागाच्या खरीप हंगामातील मूग व उडीद पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आता केवळ शेवटचे तीन दिवस शिल्लक आहेत. आपल्या उत्कृष्ट शेती व्यवस्थापनाला योग्य व्यासपीठ मिळवून देण्याची ही सुवर्णसंधी गमावू नका.

📝 ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत: ३१ जुलै २०२६

या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या शेतातील उत्कृष्ट पीक व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि उत्पादनक्षमतेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान होणार असून इतर शेतकऱ्यांसाठीही ते प्रेरणादायी ठरणार आहे.

📌 लक्षात ठेवा: ✅ अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे. ✅ आवश्यक कागदपत्रे व माहिती वेळेत पूर्ण करा. ✅ शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आजच अर्ज करा.

🌾 इतर खरीप नगदी पिकांच्या स्पर्धेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत आहे.

अधिक माहितीसाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी सहाय्यक किंवा कृषी विभागाशी संपर्क साधा.

"आपल्या कष्टाला योग्य मान्यता मिळवण्यासाठी आजच पीक स्पर्धेत सहभागी व्हा!" 🌱🏆

#पीकस्पर्धा2026 #मूग #उडीद #खरीपहंगाम #शेतकरी #कृषीविभाग #आधुनिकशेती

Deendayal Research Institute Indian Council of Agricultural Research CMOMaharashtra Icaratari Pune Collector Office Beed - जिल्हाधिकारी कार्यालय बीड कृषी विभाग बीड Tao Ambajogai तालुका कृषी अधिकारी,अंबाजोगाई

🌾 अखिल भारतीय सेवा प्रमुख श्री. पराग अभ्यंकर यांची सदिच्छा भेटदीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र, आंबाजोगाई येथे अख...
25/07/2026

🌾 अखिल भारतीय सेवा प्रमुख श्री. पराग अभ्यंकर यांची सदिच्छा भेट

दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र, आंबाजोगाई येथे अखिल भारतीय सेवा प्रमुख श्री. पराग अभ्यंकर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी दीनदयाल शोध संस्थान, बीड प्रकल्पाचे प्रमुख डॉ. उपेंद्र कुलकर्णी उपस्थित होते.

भेटीच्या प्रारंभी डॉ. नितीन धर्मराव यांनी श्री.अभ्यंकर यांचे स्वागत केला.

यानंतर श्री. अभ्यंकर यांनी कृषि विज्ञान केंद्रातील सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधत केंद्रामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, संशोधनाधारित तंत्रज्ञान प्रसार, शेतकरी हिताच्या योजना तसेच नाविन्यपूर्ण प्रकल्पांची सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यांनी केंद्रातील विविध विभाग व प्रकल्पांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि केंद्रामार्फत होत असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत कार्यसंघाचे कौतुक केले.

कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. वसंत देशमुख यांनी केंद्राच्या विविध प्रकल्पांची, संशोधन व विस्तार उपक्रमांची तसेच शेतकरी विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध गतिविधींची सविस्तर माहिती सादर केली.

यावेळी श्री. अभ्यंकर यांनी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ड्रोनला भेट देऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेतली. तसेच पीक संरक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या कृषी ड्रोनच्या फवारणीचे प्रात्यक्षिक पाहून त्याची कार्यक्षमता व शेतकऱ्यांसाठी असलेले महत्त्व जाणून घेतले. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर ही काळाची गरज असून अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

#दीनदयालशोधसंस्थान #कृषिविज्ञानकेंद्र #आंबाजोगाई

Deendayal Research Institute Ministry of Agriculture & Farmer’s Welfare, Government of India Indian Council of Agricultural Research Collector Office Beed - जिल्हाधिकारी कार्यालय बीड सहाय्यक कृषि अधिकारी Icaratari Pune Shivraj Singh Chouhan

🌾📢 पीक विमा योजनेत सहभागी व्हा... आपल्या शेतीला द्या आर्थिक संरक्षण! 🌾✅ पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्...
24/07/2026

🌾📢 पीक विमा योजनेत सहभागी व्हा... आपल्या शेतीला द्या आर्थिक संरक्षण! 🌾

✅ पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

📌 ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक (अनिवार्य)
📌 ७/१२ उतारा
📌 आधार कार्ड
📌 आधार संलग्न बँक पासबुक
📌 पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र

शेतकरी अधिकृत बँक, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC), www.pmfby.gov.in पोर्टल किंवा केंद्र शासनाचे Crop Insurance App द्वारे अर्ज करू शकतात.

⚠️ महत्त्वाच्या सूचना

🗓️ अंतिम मुदत : ३१ जुलै २०२६

🏢 बीड जिल्ह्यासाठी विमा कंपनी : SBI General Insurance

✔️ ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांकाशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
✔️ विमा भरल्यानंतर डिजिटल क्रॉप सर्व्हे मध्ये पीक नोंद करणे अनिवार्य आहे.
✔️ डिजिटल क्रॉप सर्व्हेतील पीक आणि विमा अर्जातील पीक यामध्ये तफावत असल्यास डिजिटल क्रॉप सर्व्हेतील नोंद अंतिम मानली जाईल आणि अर्ज रद्द होऊ शकतो.
✔️ किमान ०.१० हेक्टर क्षेत्र पिकाखाली असणे आवश्यक आहे.
✔️ कर्जदार व बिगर कर्जदार दोन्ही शेतकरी स्वेच्छेने या योजनेत सहभागी होऊ शकतात.
✔️ आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे.
✔️ चुकीची माहिती देऊन गैरफायदा घेतल्यास पुढील ५ वर्षे कृषी योजनांपासून वंचित राहावे लागू शकते.

💡 CSC बाबत महत्त्वाची माहिती

पीक विमा अर्जासाठी CSC चालकांना विमा कंपनीकडून प्रति शेतकरी ₹६० सेवा शुल्क दिले जाते. त्यामुळे विमा हप्त्याव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क देऊ नका.

🌱 लक्षात ठेवा

📍 सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखीम स्तर ७०% आहे.

☎️ अधिक माहितीसाठी

काही अडचण असल्यास संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जवळची बँक किंवा टोल फ्री क्रमांक १४४४७ वर संपर्क साधा.

🌾 आजच पीक विमा योजनेत सहभागी व्हा आणि आपल्या कष्टाने उभ्या केलेल्या पिकाला आर्थिक संरक्षण द्या. वेळेत विमा भरा, सुरक्षित शेती करा!

#पीकविमा2026 #बीडजिल्हा #कृषीसल्ला #शेतकरीहित #खरीपहंगाम2026 #डिजिटलक्रॉपसर्व्हे #कृषीविज्ञानकेंद्र

Deendayal Research Institute Ministry of Agriculture & Farmer’s Welfare, Government of India Collector Office Beed - जिल्हाधिकारी कार्यालय बीड Shivraj Singh Chouhan Indian Council of Agricultural Research Icaratari Pune कृषी विभाग बीड सहाय्यक कृषि अधिकारी

📋 गुणवत्ता, पारदर्शकता आणि सातत्यपूर्ण सुधारणा याकडे आणखी एक महत्त्वाचे पाऊल! 🌱दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र, ...
21/07/2026

📋 गुणवत्ता, पारदर्शकता आणि सातत्यपूर्ण सुधारणा याकडे आणखी एक महत्त्वाचे पाऊल! 🌱

दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र, आंबाजोगाई येथे ISO 9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीच्या (Quality Management System) अंमलबजावणीसाठी स्टेज-२ ऑडिट प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. जागतिक स्तरावरील आघाडीची प्रमाणन संस्था SGS यांच्या तज्ज्ञांकडून या प्रक्रियेचे परीक्षण करण्यात आले आहे.

कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारे प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, तंत्रज्ञान प्रसार, कार्यालयीन व्यवस्थापन, दस्तऐवजीकरण, सेवा गुणवत्ता आणि सातत्यपूर्ण सुधारणा या सर्व बाबींचे ISO मानकांनुसार मूल्यमापन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, केंद्रामध्ये यापूर्वीपासूनच ISO गुणवत्ता व्यवस्थापनाच्या तत्त्वांचे प्रभावीपणे पालन करण्यात येत असून, त्याच प्रणालीला अधिक सक्षम आणि अद्ययावत करण्याच्या दिशेने हे स्टेज-२ ऑडिट महत्त्वाचे ठरत आहे.

ISO 9001:2015 ही केवळ गुणवत्ता प्रमाणपत्राची प्रक्रिया नसून पारदर्शक, उत्तरदायी, शेतकरी-केंद्रित आणि परिणामकारक सेवा देण्याची आंतरराष्ट्रीय दर्जाची कार्यपद्धती आहे. या प्रक्रियेमुळे कृषी विज्ञान केंद्राच्या सेवांची गुणवत्ता अधिक बळकट होईल आणि शेतकऱ्यांना वेळेवर, विश्वासार्ह व दर्जेदार तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची आमची बांधिलकी अधिक दृढ होईल.

दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र, आंबाजोगाई हे "शेतकरी प्रथम" या तत्त्वावर कार्य करत असून, आधुनिक व्यवस्थापन प्रणाली, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण सुधारणा यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे.



Deendayal Research Institute Indian Council of Agricultural Research Collector Office Beed - जिल्हाधिकारी कार्यालय बीड सहाय्यक कृषि अधिकारी Icaratari Pune कृषी विभाग बीड Ministry of Agriculture & Farmer’s Welfare, Government of India

🌾🇮🇳 भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा (ICAR) ९८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा! 🇮🇳🌾दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र, आ...
18/07/2026

🌾🇮🇳 भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा (ICAR) ९८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा! 🇮🇳🌾

दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र, आंबाजोगाई येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा (ICAR) ९८ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी आयोजित कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. वसंत देशमुख यांनी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला. उच्च उत्पादक वाणांची निर्मिती, हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, कृषी यांत्रिकीकरण, पशुसंवर्धन, मत्स्यपालन, डिजिटल कृषी आणि कृषी विस्तार व्यवस्थेद्वारे देशातील शेतकऱ्यांच्या प्रगतीमध्ये भाकृअनुपचे अतुलनीय योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. देशमुख यांनी कृषी विज्ञान केंद्रे ही भाकृअनुप आणि शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून, संशोधनातून विकसित होणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचे कार्य प्रभावीपणे करत असल्याचे नमूद केले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर विज्ञानाधारित शेती, नवतंत्रज्ञानाचा स्वीकार आणि संशोधनाधारित निर्णय यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

"Reimagining Agriculture for Viksit Bharat @2047" या संकल्पनेला साकार करण्यासाठी संशोधन, नवोन्मेष आणि शेतकरी-केंद्रित कृषी विस्तार सेवांचा प्रभावी संगम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या ९८ व्या वर्धापन दिनानिमित्त देशातील सर्व शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांना आणि अन्नदाते शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा! 🌱



Deendayal Research Institute Indian Council of Agricultural Research Ministry of Agriculture & Farmer’s Welfare, Government of India Collector Office Beed - जिल्हाधिकारी कार्यालय बीड सहाय्यक कृषि अधिकारी Shivraj Singh Chouhan Icaratari Pune Sakal ग्रामऊर्जा फ़ाउंडेशन GramUrja Foundation

📰🌾 दैनिक ॲग्रोवनमध्ये दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्राच्या उपक्रमाची दखल! 🌾📰कृषी क्षेत्रातील अग्रगण्य आणि शेतकऱ्...
18/07/2026

📰🌾 दैनिक ॲग्रोवनमध्ये दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्राच्या उपक्रमाची दखल! 🌾📰

कृषी क्षेत्रातील अग्रगण्य आणि शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार असलेल्या दैनिक ॲग्रोवनमध्ये दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र, आंबाजोगाई यांच्या महिला उद्योजकता उपक्रमाची यशोगाथा प्रमुखत्वाने प्रकाशित झाल्याबद्दल आम्हाला मनस्वी आनंद आणि अभिमान वाटतो.

ही बातमी केवळ एका उपक्रमाची प्रसिद्धी नसून, स्वतःच्या कष्टाने आणि जिद्दीने स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारलेल्या ग्रामीण महिला उद्योजिकांच्या कार्याचा सन्मान आहे. आज त्यांच्या हातांनी तयार होणाऱ्या प्रक्रिया उत्पादनांना राज्यव्यापी व्यासपीठ मिळत आहे, ही प्रत्येक सहभागी महिलेसाठी प्रेरणादायी आणि अभिमानाची बाब आहे.

या यशामुळे महिलांचा आत्मविश्वास अधिक दृढ होईल, नव्या उमेदीने आणि उत्साहाने त्या आपल्या उद्योगाचा विस्तार करतील, असा विश्वास आहे. तसेच ग्रामीण भागातील इतर महिलांनाही उद्योग, स्वावलंबन आणि आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग स्वीकारण्यासाठी नवी प्रेरणा मिळेल.

या उपक्रमाच्या यशामागे योगदान देणाऱ्या सर्व महिला उद्योजिका, मार्गदर्शक, प्रशिक्षक, अधिकारी आणि प्रत्येक कर्त्या हातांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐

"महिलांच्या कष्टाला बाजारपेठ, कौशल्याला संधी आणि स्वप्नांना नवी दिशा" — याच ध्येयाने आम्ही ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत राहू.

#महिला_उद्योजकता #ग्रामीणमहिला_सक्षमीकरण #आत्मनिर्भरमहिला

Deendayal Research Institute Ministry of Agriculture & Farmer’s Welfare, Government of India Indian Council of Agricultural Research Collector Office Beed - जिल्हाधिकारी कार्यालय बीड Agrowon सहाय्यक कृषि अधिकारी Shivraj Singh Chouhan Icaratari Pune ऑनलाइन न्यूजपेपर कृषी सोबती

🌾 महिला सक्षमीकरणासाठी प्रेरणादायी उपक्रम! 🌾दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र, आंबाजोगाई यांच्या वतीने ऊसतोड कामगा...
18/07/2026

🌾 महिला सक्षमीकरणासाठी प्रेरणादायी उपक्रम! 🌾

दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र, आंबाजोगाई यांच्या वतीने ऊसतोड कामगार कुटुंबांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपजीविका प्रकल्पास सामाजिक कार्यकर्त्या सौ. शोभाताई वाघमारे यांनी भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली.

डॉ. उपेंद्र कुलकर्णी आणि सौ. संध्या कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२१ पासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे बीड जिल्ह्यातील अनेक ऊसतोड कामगार महिलांना गावातच शाश्वत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. प्रशिक्षण, आधुनिक यंत्रसामग्री, उत्पादन गुणवत्ता, पॅकिंग, ब्रँडिंग आणि विपणनाच्या माध्यमातून महिला आज विविध खाद्यपदार्थ तयार करून यशस्वीपणे बाजारपेठेत विक्री करत आहेत. या उद्योगातून महिला बचत गटाला दरमहा सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असून अनेक कुटुंबांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळाली आहे.

भेटीदरम्यान सौ. शोभाताई वाघमारे यांनी महिलांच्या यशोगाथा जाणून घेत त्यांच्या जिद्द, आत्मविश्वास आणि स्वावलंबी कार्याचे कौतुक केले. सौ. संध्याताई कुलकर्णी यांनी उत्पादन वाढ, गुणवत्तापूर्ण निर्मिती आणि बाजारपेठ विस्ताराबाबत मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. वसंत देशमुख यांनी ऊसतोड कामगारांच्या सामाजिक-आर्थिक समस्या, भविष्यातील यांत्रिकीकरणाची आव्हाने आणि पर्यायी रोजगारनिर्मितीचे महत्त्व अधोरेखित केले.

🌱 गावातच रोजगार, महिलांचे सक्षमीकरण आणि स्थलांतरमुक्त, स्वावलंबी ग्रामीण भारत घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.

#महिला_सक्षमीकरण #स्वावलंबन #ग्रामीणविकास

Deendayal Research Institute Ministry of Agriculture & Farmer’s Welfare, Government of India Indian Council of Agricultural Research Collector Office Beed - जिल्हाधिकारी कार्यालय बीड Shivraj Singh Chouhan सहाय्यक कृषि अधिकारी Icaratari Pune Agrowon

🤖🌾 कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने शेतीत नवे पर्व! 🌾🤖दीनदयाल रिसर्च इन्स्टिट्यूट, कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई ...
17/07/2026

🤖🌾 कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने शेतीत नवे पर्व! 🌾🤖

दीनदयाल रिसर्च इन्स्टिट्यूट, कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (BATU), लोणेरे यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित कृषी प्रणालीचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. हा उपक्रम शेतकऱ्यांना अचूक, शास्त्राधारित आणि हवामान अनुकूल शेतीसाठी नवे तांत्रिक बळ देणारा ठरणार आहे.

या प्रणालीद्वारे जमिनीतील ओलावा, तापमान, हवेतील आर्द्रता, विद्युत वाहकता, क्षारता तसेच इतर महत्त्वाच्या घटकांचे सेन्सरद्वारे सातत्याने निरीक्षण केले जाणार आहे. या माहितीच्या आधारे सिंचन व्यवस्थापन, खतांचे अचूक नियोजन, पीक वाढीचे निरीक्षण आणि उत्पादनवाढीसाठी वैज्ञानिक निर्णय घेणे अधिक सुलभ होईल.

कृषि विज्ञान केंद्राच्या हिवरा प्रक्षेत्रावर स्वयंचलित हवामान केंद्राची स्थापना करण्यात आली असून, त्याद्वारे परिसरातील शेतकऱ्यांना स्थानिक हवामानाची अचूक माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच सोयाबीन, तूर आणि आंबा या प्रमुख पिकांवर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित संशोधन राबवून त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीनदयाल रिसर्च इन्स्टिट्यूट बीडचे प्रकल्प प्रमुख डॉ. उपेंद्र कुलकर्णी होते. प्रमुख उपस्थितीत प्रा. संजय नलबलवार, डॉ. ब्रिजेश अय्यर, प्रा. रामचंद्र मंठाळकर, ॲग्रीपायलट एआयचे निखिल मानेकर तसेच कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. वसंत देशमुख उपस्थित होते.

🌱 संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा संगम घडवून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिक उत्पादन, कमी खर्च आणि शाश्वत शेतीकडे नेण्याचा हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे.



Deendayal Research Institute Ministry of Agriculture & Farmer’s Welfare, Government of India Icaratari Pune Collector Office Beed - जिल्हाधिकारी कार्यालय बीड Indian Council of Agricultural Research Shivraj Singh Chouhan सहाय्यक कृषि अधिकारी PMO India कृषी विभाग बीड DDSahyadri

🎉 Facebook recognized us as a consistent post creator this week!
17/07/2026

🎉 Facebook recognized us as a consistent post creator this week!

Address

Ambajogai-Kaij Haighway, At Digholamba, Post Lokhandi Sawargav, Tq. Ambajogai, Dist Beed 431 517 (MS)
Ambajogai
431517

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+919881224735

Alerts

Be the first to know and let us send you an email when कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई:

Shortcuts

Share