19/12/2024
*डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन राज्य पुरुष व महिला अजिंक्यपद व निवड चाचणी न भूतो न भविष्य अशी पार पडली*
रायगड - सन २०२४-२५ या वर्षाच्या राज्य पुरुष व महिला अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धांचे आयोजन बदलापूर येथे करण्यात आलेले होते. सदर स्पर्धांचे यजमानपद ठाणे जिल्यातील बदलापूर येथील शिवभक्त क्रीडा मंडळ वडवली व शिवभक्त विद्यालय वडवली यांनी स्विकारले होते. उपरोक्त स्पर्धेचे सर्व आयोजन आपले लोकप्रिय शिक्षक मतदार संघाचे कोकण विभाग आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी केले होते. निवड चाचणी आमदारांचे मोठे बंधू स्व. केशव दाद म्हात्रे यांच्या स्मरणार्थ "स्व. केशव दाद म्हात्रे करंडक" या शिर्षकाखाली ठेवण्यात अली होती. डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन च्या मान्यतेने शिवभक्त क्रीडा मंडळ नवीन वडवली बदलापूर व डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्याने शिक्षक मतदार संघाचे क्रीडाप्रेमी, कार्यसम्राट आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या संपूर्ण सहकार्याने व प्रेरणेने घेण्यात आली होती. दि. ७ डिसेंबर दुपारी ०२ वाजता सामन्यांना सुरुवात झाली. उदघाटन प्रसंगी आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे व त्यांच्याच शाळेतील दोन विद्यार्थांनी ज्या शिव छत्रपती पुरस्कार विजेत्या आहेत अश्या कु. राठोड व कु भोईर उपस्थित होत्या. २१ जिल्यातील पुरुष संघ व ११ जिल्यातील महिला संघ सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशी दिनांक ०८ डिसेंबर २०२४ ला उपांत्य फेरी व अंतिम फेरी खेळवण्यात आली. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील डायरेक्ट व्हॉलीबॉल चे नामवंत खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी सर्व बदलापुरातील क्रीडा रसिकांना मिळाली. उपरोक्त स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन जिल्हाध्यक्ष, सचिव व शिवभक्त विद्यालयातील कर्मचारी कसून काम करत होते. आयोजकांकडून सदर स्पर्धांमध्ये सर्वांचा सन्मान केला तसेच अंतिम सामना पुरुष गट मधी सोलापूर विरुद्ध मुंबई असा झाला त्यात सोलापूर या संघाने विजय संपादन केले. महिल्यांच्या गटात वर्धा विरुद्ध सोलापूर संघात लढत झाली वर्धा जिल्यातील नामवंत खेळाडूंनी छान असा खेळ करत सामना आपल्या खिश्यात घातला. विजेत्या संघांना व गुणवंत खेळाडूंना आकर्षक बक्षिसे देण्यात आले व अजून काही आर्थिक, सामाजिक मदत लागली ती असोसिएशन ला आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी बैठकीत सांगितल्या प्रमाणे केली. महाराष्ट्र अध्यक्ष श्री. डी. बी. साळुंके यांनी सुद्धा जाहीर केले की आपल्या लोकप्रिय, दानशूर, सगळ्यांना समजून घेणारे कार्यसम्राट आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जो विश्वास आमच्यावर टाकलाय तो मी व माझ्या असोसिएशन चे पदाधिकारी आम्ही सार्थक करून दाखवला आणि स्पर्धा उत्कृष्ट अश्या पार पाडण्यासाठी जी मेहनत शिवभक्त विद्यालयाने घेतली त्या बद्दल त्यांचे आभार मानले. डायरेक्ट व्हॉलीबॉल महाराष्ट्र सेक्रेटरी श्री दिपक मोकल सर यांनी आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचे खूप खूप आभार मानले, इतक्या मोठ्या स्पर्धा उत्कृष्ट पार पाडून दाखवल्या, ह्या स्पर्धा पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व शिवभक्त क्रीडा मंडळ अश्या सर्वांचे आभार दीपक मोकल सरांनी मानले तसेच पुन्हा एकदा आमदार करण्यासाठी जी काही मेहनत लागेल ती मी स्वतः तुमच्या साठी करेन असे जाहीर केले . बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आमदार श्री, ज्ञानेश्वर म्हात्रे, डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन अध्यक्ष श्री दि. बी. साळुंके, सेक्रेटरी श्री दीपक मोकल, समाजसेवक भावेश केशव दादा म्हात्रे, शिवभक्त क्रीडा मंडळ, शिवभक्त विद्यालय शिक्षक, कर्मचारी, विध्यार्थी, डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन पदाधिकारी व राज्य पंच उपस्थित होते.
बक्षीस समारंभ जल्लोषात पार पडला, निवड झालेल्या खेळाडूंना ना प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय स्थरावर पाठवण्यात येणार आहे. अश्या प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात सामने पार पडले.