Pratap Krida Mandal, Shankarnagar-Akluj

Pratap Krida Mandal, Shankarnagar-Akluj Official page : Pratap Krida Mandal, Shankaranagar-Akluj

प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज आयोजित #भव्य_आट्यापाट्या_स्पर्धा_२०२६🗓️ रविवार दि.२३ ऑगस्ट २०२६🏛️ स्थळ- श्री विजयसिंह ...
25/08/2026

प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज आयोजित

#भव्य_आट्यापाट्या_स्पर्धा_२०२६

🗓️ रविवार दि.२३ ऑगस्ट २०२६
🏛️ स्थळ- श्री विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज

प्रताप क्रीडा मंडळाच्या आट्यापाट्या स्पर्धेत शिरढोणच्या श्रीकृष्ण संघाचे पटकावले अंतिम विजेतेपद....अकलूज : प्रताप क्रीडा...
24/08/2026

प्रताप क्रीडा मंडळाच्या आट्यापाट्या स्पर्धेत शिरढोणच्या श्रीकृष्ण संघाचे पटकावले अंतिम विजेतेपद....

अकलूज : प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज वतीने मंडळाच्या अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण भागातील मराठमोळ्या व रांगड्या आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेत शिरढोण (ता. पंढरपूर) येथील श्रीकृष्ण-अ संघाने धायटी (ता. सांगोला) येथील बिटू माने संघाचा अत्यंत अटीतटीच्या अंतिम सामन्यात पराभव करत विजेतेपदाचा मान पटकाविला. विजेत्या संघास मंडळाचे संस्थापक मा. श्री. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या हस्ते आकर्षक चषक व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल येथे रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक मा. चि. सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी मा. श्री. दीपकराव खराडे-पाटील, सुमित्रा पतसंस्थेचे चेअरमन मा. श्री. महादेव अंधारे, शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूजचे सहसचिव मा. श्री. हर्षवर्धन खराडे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मैदान पूजनानंतर स्पर्धेला सुरुवात झाली.
ग्रामीण भागातील या पारंपरिक खेळाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर २८, माळशिरस २५, सांगोला ७, माढा ६, मंगळवेढा १ आणि इंदापूर १, अशा ६८ नामवंत संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या सामन्यांचा थरार रात्री तब्बल २.३० वाजेपर्यंत सुरू होता.
अंतिम सामन्यात श्रीकृष्ण-अ, शिरढोण आणि बिटू माने, धायटी या दोन बलाढ्य संघांमध्ये चुरशीची लढत झाली. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी दमदार खेळाचे प्रदर्शन केल्याने सामना अत्यंत रोमहर्षक ठरला. अखेर श्रीकृष्ण-अ, शिरढोण संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला.

स्पर्धेतील बक्षीसपात्र संघ-
* प्रथम क्रमांक – श्रीकृष्ण-अ, शिरढोण (पंढरपूर) – रु. ४४,००० व आकर्षक चषक
* द्वितीय क्रमांक – बिटू माने, धायटी (सांगोला) – रु. ३३,०००
* तृतीय क्रमांक – डोनाई डोनमळा, पळशी (पंढरपूर) – रु. २२,०००
* चतुर्थ क्रमांक – सद्गुरू भवानीगिरी, शिरभावी-अ (सांगोला) – रु. ११,०००

उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेल्या बालाजी मित्र मंडळ, गादेगाव (पंढरपूर), श्रीराम पेहे (पंढरपूर), जय हनुमान तांदुळवाडी (माळशिरस) आणि काशिलिंग धायटी (सांगोला) या चार संघांना प्रत्येकी रु. ५,००० चे बक्षीस देण्यात आले.

स्पर्धेचे समालोचन बापूसाहेब लोकरे यांनी केले. सूत्रसंचालनाची धुरा इलाही बागवान, अनंत कोळी, किरण सूर्यवंशी आणि राजकुमार पाटील यांनी सांभाळली.

मुख्य पंच म्हणून बंडूकाका ताठे-देशमुख, पंडित नाना ताठे-देशमुख, आबासाहेब ताठे-देशमुख, विक्रम मिसाळ, उद्धव केंगार, बाळासाहेब सरवदे आणि लालासाहेब बाबर यांनी काम पाहिले. तसेच ६८ फाटी पंचांनी स्पर्धेतील सामन्यांचे पंच म्हणून जबाबदारी पार पाडली.

या स्पर्धेस मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले-पाटील, सचिव बिभीषण जाधव, स्पर्धा प्रमुख भीमाशंकर पाटील, सुभाष चव्हाण,संचालक, आजी-माजी खेळाडू, सहभागी संघांचे खेळाडू तसेच आट्यापाट्याच्या थराराचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते. मंडळाच्या संपूर्ण संयोजन समितीने अहोरात्र परिश्रम घेतल्याने स्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण व यशस्वीरीत्या पार पडल्या.

प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज आयोजित  #भव्य_आट्यापाट्या_स्पर्धा_२०२६ प्रताप क्रीडा मंडळाच्या भव्य आट्यापाट्या स्पर्ध...
23/08/2026

प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज आयोजित #भव्य_आट्यापाट्या_स्पर्धा_२०२६

प्रताप क्रीडा मंडळाच्या भव्य आट्यापाट्या स्पर्धेचा दिमाखात शुभारंभ

ग्रामीण मातीतला शिवकालीन खेळ पुन्हा मैदानात; ६८ संघांचा उत्स्फूर्त सहभाग

अकलूज : युवाशक्तीचा सर्वांगीण विकास साधत त्यांना समाजविधायक कार्याची दिशा देण्याबरोबरच बौद्धिक व शारीरिक उत्कर्ष साधण्याच्या उद्देशाने प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा २०२६ चा उद्घाटन सोहळा रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल, अकलूज येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
मंडळाचे संस्थापक मा. श्री. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मंडळाच्या अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील अस्सल मराठमोळा आणि शिवकालीन परंपरेशी नाते सांगणारा आट्यापाट्या हा पारंपरिक मैदानी खेळ नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, तसेच युवकांमध्ये खेळाची आवड, संघभावना, शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित करणे हा या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश आहे.
स्पर्धेचे उद्घाटन अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक मा. चि. सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी मा. श्री. दिपकराव खराडे-पाटील, सुमित्रा पतसंस्थेचे चेअरमन महादेव अंधारे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव मा. श्री. हर्षवर्धन खराडे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मंडळाचे सचिव बिभीषण जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी प्रताप क्रीडा मंडळाच्या स्थापनेमागील उद्देश, मंडळाचा संक्षिप्त इतिहास आणि विविध क्रीडा व सामाजिक उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील (काकासाहेब) व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील (आक्कासाहेब) यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले. स्पर्धेची सुरुवात स. म. शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना, शंकरनगर-अकलूज यांच्या दोन संघांमध्ये झालेल्या प्रदर्शनीय सामन्याने झाली.
या स्पर्धेला ग्रामीण भागातील खेळाडूंचा मोठा प्रतिसाद मिळाला असून एकूण ६८ संघांनी स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये माळशिरस येथील २५, पंढरपूर २८, माढा ६, सांगोला ७, मंगळवेढा १ आणि इंदापूर १ अशा संघांचा समावेश आहे. त्यामुळे स्पर्धेच्या निमित्ताने विविध तालुक्यांतील खेळाडूंना एकत्र येत आपल्या क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली आहे.
मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष मा. श्री. जयसिंह मोहिते-पाटील यांनी स्पर्धास्थळी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढविला. पारंपरिक खेळांना आधुनिक काळातही व्यासपीठ मिळणे आवश्यक असून युवकांनी मोठ्या संख्येने मैदानी खेळांकडे वळावे, असा संदेश या स्पर्धेतून देण्यात आला.
विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे स्पर्धेतील विजेत्या संघांसाठी मंडळाच्या वतीने आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी ४४ हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकासाठी ३३ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी २२ हजार रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी ११ हजार रुपये अशी बक्षिसे आहेत. तसेच उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या चार संघांना प्रत्येकी ५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. अशा प्रकारे स्पर्धेसाठी एकूण १ लाख ३० हजार रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले-पाटील, यशवंत माने-देशमुख, स्पर्धा प्रमुख भीमाशंकर पाटील, सुभाष चव्हाण, मंडळाचे संचालक व सदस्य, विविध संघांचे आजी-माजी खेळाडू तसेच मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी समालोचन सुप्रसिद्ध बापूसाहेब लोकरे यांनी केले, तर इलाही बागवान व अनंत कोळी यांनी सूत्रसंचालन केले.
उद्घाटन सोहळ्यानंतर मैदानावर विविध संघांमधील चुरशीच्या आणि रंगतदार सामन्यांना प्रारंभ झाला. पारंपरिक आट्यापाट्या खेळातील वेग, चपळाई, डावपेच आणि संघभावनेचा थरार अनुभवण्यासाठी क्रीडाप्रेमींची मोठी गर्दी झाली होती. ग्रामीण मातीत रुजलेल्या या पारंपरिक खेळाला पुन्हा एकदा मोठे व्यासपीठ मिळाल्याने परिसरात क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

22/08/2026

प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज आयोजित

#भव्य_आट्यापाट्या_स्पर्धा_२०२६*

🗓️ रविवार दि.२३ ऑगस्ट २०२६
🏛️ स्थळ- श्री विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज

🕑 वेळ- सकाळी १०.०० वा.

प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज आयोजित  #भव्य_आट्यापाट्या_स्पर्धा_२०२६🗓️ रविवार दि. २३ ऑगस्ट २०२६🏛️ स्थळ- विजयसिंह मोह...
22/08/2026

प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज
आयोजित #भव्य_आट्यापाट्या_स्पर्धा_२०२६

🗓️ रविवार दि. २३ ऑगस्ट २०२६
🏛️ स्थळ- विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज
🕑 वेळ- सकाळी १०.०० वा.

प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने अकलुज येथे भव्य आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन....अकलूज (प्रतिनीधी)सन १९७८ पासून कला, क्रीडा,...
19/08/2026

प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने अकलुज येथे भव्य आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन....

अकलूज (प्रतिनीधी)
सन १९७८ पासून कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज ने मंडळाचे संस्थापक मा.श्री. जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा, बालक्रीडा स्पर्धा, समूहनृत्य स्पर्धा, कुस्ती स्पर्धा याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना दिवाळी फराळ रत्नाई मिठाई वाटप, रक्तदान शिबीर असे अनेक उपक्रम राबवले आहेत. त्याच पद्धतीने याही वर्षी शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूजचे अध्यक्ष मा. श्री. संग्रामसिंह मोहिते पाटील, मंडळाच्या अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील, युवा नेते मा. चि. सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वात रविवार दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज येथे भव्य राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यास्पर्धेस राज्यातील मुंबई, उस्मानाबाद, पंढरपूर, माढा, सांगोला, मंगळवेढा, करमाळा यासह विविध भागातील अनेक संघांनी सहभाग घेऊन ग्रामीण भागातील अस्सल मर्दानी खेळाचा आनंद लुटला आहे व भरघोस बक्षिसे मिळविली आहेत.
या स्पर्धेसाठी भव्य अशी १,३०,००० रु.ची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकास ४४०००/- द्वितीय क्रमांकास ३३०००/- तृतीय क्रमांकास २२०००/- चतुर्थ क्रमांकास ११०००/- तर उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या ४ संघास प्रत्येकी ५०००/- रु चे बक्षीस देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सहभागी संघास ५००/- रुपये अशी नाममात्र प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. तसेच सहभागी खेळाडूंना मंडळाच्या वतीने मोफत भोजनाची सोय करण्यात आली आहे.
या स्पर्धेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी ९८६०३३१७१७,९३२५२५२९९६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाचे सचिव बिभीषण जाधव यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष पोपटराव भोसले-पाटील, स्पर्धा प्रमुख भीमाशंकर पाटील, सुभाष चव्हाण, संचालक व सदस्य उपस्थित होते.

https://youtube.com/playlist?list=PLRBg7rikK8cI&si=Zmwy0hcS5UbYabHI॥ नागपंचमी सण २०२६॥श्रावण म्हणजे हिरवाईने नटलेला निसर...
16/08/2026

https://youtube.com/playlist?list=PLRBg7rikK8cI&si=Zmwy0hcS5UbYabHI

॥ नागपंचमी सण २०२६॥
श्रावण म्हणजे हिरवाईने नटलेला निसर्गाचा उत्सव... आणि मनामनांत फुलणारा परंपरेचा सोहळा!
वरुणराजाच्या साक्षीने निसर्गाच्या कोंदणात आनंदाचे दान देणारा हा पवित्र महिना. श्रावणातल्या ऊन-पावसाच्या खेळासोबतच रंगतो तो आपल्या माय-भगिनींचा उत्साह! कधी झाडाला बांधलेला झोका गगनाला भिडायचा, तर कधी अंगणात झिम्मा, फुगडी आणि पिंग्याचा ठेका धरायचा... काटवट-कणा आणि नागपंचमीचे ते फेर म्हणजे आनंदाला आलेले खरे उधाण!
बदलत्या काळाच्या ओघात लोप पावत चाललेला हाच अस्सल आनंद पुन्हा एकदा जगण्यासाठी, हसण्यासाठी आणि आपल्या समृद्ध परंपरांचा वारसा एकत्र येऊन जोपासण्यासाठी... 'नागपंचमी सणाचे' हे आपुलकीचे निमंत्रण!
इथे नात्यांचा गुंफलेला मेळा असेल,आनंदाची बरसात असेल आणि आपल्या संस्कृतीचा गौरव असेल.या सर्वधर्मीय श्रावणी उत्सवात आपला सहभाग हाच आमचा खरा आनंद!

सोहळ्याचे दिवस: रविवार, १६ ऑगस्ट २०२६ व सोमवार, १७ ऑगस्ट २०२६

वेळ: सायंकाळी ४:०० ते ८:०० वाजता

स्नेहस्थळ: शिवपार्वती मंदिर, शंकरनगर - अकलूज

आपुलकीची नोंद:
वरील दोन्ही दिवशी सायंकाळी ४ ते ८ या वेळेत मंदिर परिसरात फक्त आणि फक्त 'महिला भगिनींनाच' प्रवेश असेल.

चला या... खेळू या... आणि श्रावणाचा हा अनुपम आनंद आठवणींच्या कप्प्यात साठवू या!

आपली स्नेही,
मा.कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील
सदस्य, महाशिवरात्र यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट, शंकरनगर-अकलूज

#नागपंचमी #अकलूज नागपंचमी सण २०२६ रविवार,दिनांक १६ व सोमवार,१७ ऑगस्ट २०२६ रोजी वेळ : सायंकाळी ४ ते रात्री ८ व....

Address

Akluj

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pratap Krida Mandal, Shankarnagar-Akluj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category