14/10/2024
आपल्या नगरच्या सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी शकुंतलाबाई नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लावणी शिकायची अमूल्य संधी.
शनिवार, 19 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत URJA रंगभवन मध्ये लावणी कार्यशाळा होणार आहे. ज्यात शकुंतलाबाईसोबत लावणीचे अभ्यासक लेखक भूषण कोरगांवकर आणि लावणी सम्राट अक्षय मालवणकर यांचेही मार्गदर्शन अल्प दरात आपल्याला लाभेल. या कार्यशाळेत नुसतं लावणीची कोरियोग्राफी होणार नाही तर त्या अनुषंगाने या कलेची, इथल्या व्यवस्थेची माहिती, कला आत्मसात करण्याच्या दृष्टीने काही उपयुक्त टिप्स आणि या तिन्ही व्यक्तींचे या क्षेत्रातले राजक किस्से असा हा समग्र, भरगच्च अनुभव असेल.
याच्या जोडीला संध्याकाळी 7 वाजता ‘कही प्यार हो ना जाए’ हा लावणीवर एक आगळावेगळा सव्वा तासाचा कार्यक्रम असेल ज्यात शकुंतलाबाई नगरकर यांचं नृत्य आणि भूषण कोरगांवकर यांचं बोलणं आपल्याला अनुभवता येईल.
लावणी म्हणजे निव्वळ नाच-गाणं नाही तर त्यापलीकडे या कलेत आपलं व्यक्तिमत्त्व बदलण्यावचं एक वेगळं सामर्थ्य आहे. याचा दिवसभराचा हा अनुभव अजिबात चुकवू नका.
नाच शिकायचा असेल तर दोन्ही कार्यक्रमांना या, आणि नुसता अनुभव हवा असेल तर संध्याकाळच्या कार्यक्रमास या.
📍पत्ता - URJA रंगभवन,
एकता कॉलनी, केडगाव देवी रोड,अ. नगर.
📱संपर्क - 8600244000
✅कार्यशाळा प्रवेश मूल्य - रु 1100 मात्र
✅कार्यक्रम प्रवेश मूल्य - रु 300 मात्र