CKP Premier League

CKP Premier League Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from CKP Premier League, Sports League, Thane.

Get ready for the some breathtaking contests, thrilling showdowns and a package of excitement.16 teams will battle and o...
13/05/2025

Get ready for the some breathtaking contests, thrilling showdowns and a package of excitement.

16 teams will battle and only one will be crowned as champion.

Join us for the CPL 2025 on 17th and 18th May 2025.

सीकेपी प्रीमिअर लीग २०२५ ठाणे 🏏  🗓️ १७ - १८ मे २०२५  📍अपोलो टर्फ, खारेगाव, कळवा - ठाणे नेहेमीप्रमाणेच या वर्षीसुद्धा सीक...
04/04/2025

सीकेपी प्रीमिअर लीग २०२५ ठाणे 🏏
🗓️ १७ - १८ मे २०२५
📍अपोलो टर्फ, खारेगाव, कळवा - ठाणे
नेहेमीप्रमाणेच या वर्षीसुद्धा सीकेपी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धांचे आयोजन शनिवार १७ आणि रविवार १८ मे २०२५ रोजी करण्यात आले आहे. खारेगाव कळवा येथील अपोलो टर्फ या मैदानात सीकेपी समाजातील मुला मुलींचे अंडरआर्म क्रिकेट सामने खेळवले जातील. आपल्या धावपळीतून वेळ काढत, आपापल्या शहरातून आपले संघ तयार करत येणाऱ्या शेकडो सीकेपी खेळाडूंचा सहभाग - तितक्याच कुटुंबीयांची उपस्थिती, सामाजिक बंध दृढ करणारे खेळीमेळीचे आणि जोशपूर्ण वातावरण असलेल्या या स्पर्धांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. समाजातील उत्साही तरुण वर्गाकडून या स्पर्धेचे होत असलेले नियोजनपूर्वक व्यवस्थापन, खेळाडूंच्या सहभागाने प्रत्येक सामन्यात वाढणारी रंगत, प्रेक्षकांकडून मिळणार प्रोत्साहन, विजेत्या - उपविजेत्या संघाला मिळणारी भरघोस बक्षिसे आणि मानाचा सीकेपी प्रीमिअर लीग चषक यामुळे CPL ही स्पर्धा समाजात नेहेमीच उत्सुकता वाढवणारी असते.

या वर्षीच्या सीपीएल मधील अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे सीकेपी प्रीमिअर लीग २०२५ ही स्पर्धा काही दिवसांपूर्वीच निधन पावलेले ठाण्याचे प्रथम महापौर - माजी खासदार आणि ज्ञानसाधना महाविद्यालयाचे संस्थापक, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ज्ञातीभूषण कै सतीशचंद्र प्रधान यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित असणार आहे. सतीशकाकांच्या रूपाने सामाजिक, सांस्कृतिक राजकीय आणि क्रीडाक्षेत्राला योगदान देणाऱ्या एका उत्तम खेळाडूस सीकेपी समाजातील उदयोन्मुख खेळाडू आणि क्रीडारसिकांतर्फे कै. सतीशचंद्र प्रधान यांना दिली जाणारी ही उचित अशी श्रद्धांजली ठरेल.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी वर दिलेल्या नंबरवर फोन करून अथवा व्हाट्सअप द्वारे मेसेज करून आपले आणि आपल्या संघांचे नाव नोंदवावे आणि आपल्या प्रचंड प्रतिसादाने ही स्पर्धा यशस्वी करावी. बाहेर गावातून येणाऱ्या संघाना निवासाची सोय हवी असेल तर ती अत्यंत माफक दरांत उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल.

आपलेच,
समीर गुप्ते
आणि
सीपीएल संस्थापकीय व आयोजन समिती सदस्य

Rahul Vinay Likhite Prathamesh Raje Priya Vaidya Amey Ranadive Rasika Subhash Karkhanis

Address

Thane

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when CKP Premier League posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category