Laii Bhaari

Laii Bhaari Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Laii Bhaari, Roha.

18/01/2022

Consistency is the key.

24/06/2021

12/12/2019

मित्रांनो , इंग्रजीत एक म्हण आहे – AN APPLE A DAY KEEPS DOCTOR AWAY म्हणजे रोज जर एक सफरचंद आहारात असेल तर डॉक्टरची गरज भासणारच नाही. निश्चीतच आपल्या सभोवताली असलेल्या फळांमध्ये सफरचंद या फळाचे महत्व अनन्य साधारण आहे.

परंतु कदाचीत ब्रिटीशांकडे किंवा युरोपियन देशात पेरु चे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असते तर ही म्हण बदलली असती असे वाटते. त्याचे कारण म्हणजे पेरु या फळात असलेले गुणधर्म.

खूप वर्षांपूर्वी पोर्तुगिजांनी हे फळ भारतात आणले. सध्या भारतभर पेरुची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. आपणाला रोजच्या आहारात लागणा-या घटकांपैकी बव्हतांशी घटक पेरुमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. इतके की पेरुला सुपर फुड म्हणणे अतीशयोक्ती नाही ठरणार.

हैद्राबाद येथील नँशनल इन्स्टीट्यूट आँफ न्यूट्रीशन मध्ये 14 फळांचा एक अभ्यास केल्या गेला. त्यावेळी त्यांनी जो निष्कर्ष काढला त्यानुसार सर्व फळांच्या तुलनेत सर्वात जास्त अँन्टीआँक्सीडन्ट्सचे प्रमाण पेरुमध्ये आढळले.

100 ग्रँम पेरुमध्ये 500 मिलीग्रँम अँन्टीआँक्सीडन्ट्स आढळले तर 100 ग्रँम सफरचंद मध्ये 135 मिलीग्रँम अँन्टीआँक्सीडन्ट्स आढळले. त्यामुळे पेशींना DAMAGE होण्यापासून पर्यायाने कर्करोगापासून आपणाला दूर ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य पेरु करतो.

पेरुमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथीने, व्हिटामीन्स, मिनीरल्स व फायबर सारखी जीवनावश्यक तत्वे आढळतात. हे सर्व घटक सफरचंदमध्ये सुद्धा आढळतात. परंतु या सर्व घटकांचे प्रमाण पाहिले तर पेरुच्या तुलनेत सफरचंद शर्यतीत खूप मागे असल्याचे जाणवते.

पेरुच्या बियापासून निघालेल्या तेलात आयोडीनचे प्रमाण सुद्धा आढळून आलेले आहे त्यामुळे थायराँईड सारख्या आजाराच्या रुग्णांना पेरु निश्चीतच फायदेशीर ठरेल.

आपण पेरुविषयी व सफरचंदविषयी प्राथमीक ढोबळ माहिती घेतली. आता आपण वैज्ञानीक सखोल माहिती घेउ. तर चला दोघांची तुलना करुन पाहू-
एका बाजूला आपण 100 ग्रँम सफरचंद ठेवू तर दुसरीकडे 100 ग्रँम पेरु.

100 ग्रँम सफरचंद पासून 52 कँलरीज उर्जा मिळते तर 100 ग्रँम पेरु पासून 68 कँलरीज उर्जा मिळते.

फायबर हा आहाराचा एक आवश्यक घटक आहे. लठ्ठपणा, हृदयरोग, मधुमेह या सारख्या आजारांना दूर ठेवण्यासाठी आहारात फायबरचे प्रमाण जास्त असणे आवश्यक आहे. परंतु दुर्दैवाने आपल्या आहारात फायबरचे प्रमाण कमी असते. याकडे आपण कधीही लक्ष देत नाही.

शरीरासाठी रोज आवश्यक असणा-या फायबरची गरज जर पाहिली तर 100 ग्रँम सफरचंद पासून 10 % फायबर मिळतात तर 100 ग्रँम पेरु पासून 22% फायबर मिळतात म्हणजे साधारणत: सफरचंदपेक्षा दुपटीने जास्त फायबर पेरुपासून मिळतात. बाकी अजून कुठल्या आहारातून फायबर मिळतात याचीही माहिती पुढे मी आपणाला देणार आहे.

आता या दोन्ही फळातील प्रथीनांकडे (प्रोटीन्स) कडे वळू. 100 ग्रँम सफरचंद पासून 0.3 ग्रँम्स प्रथीने मिळतात तर 100 ग्रँम पेरु पासून 2.6 ग्रँम्स प्रथीने मिळतात. म्हणजे पेरुमध्ये सफरचंदपेक्षा 8 पटीने प्रोटीन्स असतात. प्रथीने ही BODY BUILDING साठी आवश्यक आहेत. शरीरातील सर्व महत्त्वाचे घटक हे प्रोटीन्स आहेत. रक्तापासून (हीम) ते वेगवेगळ्या हार्मोन्स पर्यंत सगळे प्रोटीन्स. पेशींची निगा राखण्यापासून ते शरीराची प्रतीकारशक्ती वाढविण्यापर्यंत सर्व कार्ये प्रथीने पाहतात.

पेरुचा सुपरफूड म्हणून मी उल्लेख केला कारण पहा. दोन्ही फळातील व्हीटामीन C कडे एकदा नजर टाकू. 100 ग्रँम सफरचंद पासून दररोज आवश्यक असणारे व्हीटामीन C ची केवळ 6 टक्के पुर्तता होते तर 100 ग्रँम पेरु पासून दररोज आवश्यक असणा-या व्हीटामीन C ची 275 टक्के गरज पूर्ण होते. पहा किती मोठ्या प्रमाणात पेरु शरीरासाठी फायदेशीर आहे.

बाकी व्हिटामीन्सचा जर विचार केला तर बी काँम्ल्पेक्स चे (B1,B2,B3,B5,B6,B9) हे सर्व व्हिटामीन पेरू मध्ये सफरचंदापेक्षा दुपटीने व तिपटीने जास्त असतात.

गरोदर स्त्रियांमध्ये मुख्यत: पहिल्या 12 आठवड्यापर्यंत फोलेटची अत्यंत गरज असते. होणा-या बाळाला काही COMPLICATIONS होउ नयेत म्हणून हे महत्वाचे असते.100 ग्राम सफरचंदमध्ये केवळ 3 मायक्रोग्राम फोलेट असते तर 100 ग्राम पेरुमध्ये 49 मायक्रोग्राम फोलेट आढळते. फरक लक्षात येईलच.
गरोदर स्त्रियांसाठी लागणारे सर्व महत्वाचे घटक (उदा –फायबर,व्हिटामीन C व बाकी मिनीरल्स) या सर्वांचे प्रमाण पेरू मध्ये जास्त असते. परंतु गरोदर स्त्रियांनी माझा लेख वाचून अंमलात आणण्यापूर्वी आपल्या स्त्रीरोग तज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा. कारण गरोदर स्त्रीसाठी ज्या काही गरजा असतात त्या कधीच केवळ रोजच्या अन्नातून पूर्ण होऊ सकत नाहीत व त्यासाठी गोळ्या औषधांची गरज भासतेच.
सफरचंद व पेरु या दोन्ही फळांमधील मिनीरल्स कडे नजर टाकू –
दरवेळी 100 ग्रँम चा उल्लेख मी टाळणार आहे. कारण लक्षात ठेवा पेरु व सफरचंदच्या स्पर्धेत आपल्या मेंदूची वाट लागू नये याची काळजी आपणाला घ्यावी लागेल.

1] कँल्शीअम – सफरचंदपासून 6 मिलीग्रँम तर पेरु पासून 18 मिलीग्रँम
2] लोह - सफरचंदपासून 0.12 मिलीग्रँम तर पेरु पासून 0.26 मिलीग्रँम
3] मँग्नेशिअम - सफरचंदपासून 5 मिलीग्रँम तर पेरु पासून 22 मिलीग्रँम
4] फाँस्फरस - सफरचंदपासून 11 मिलीग्रँम तर पेरु पासून 40 मिलीग्रँम
5] पोटँशिअम - सफरचंदपासून 107 मिलीग्रँम तर पेरु पासून 417 मिलीग्रँम

भरपूर प्रमाणात क जीवनसत्व देणारे पेरु हे फळ थंडीच्या दिवसात निरनिराळ्या व्हायरस पासून संरक्षण मिळवून देणारे आहे. आंबट खाल्ले की सर्दी खोकला होतो या गैरसमजामुळे मुलांना चिंच, आवळा, पेरु या फळांपासून दूर ठेवण्याकडे आपला कल असतो. शंभरातून एखाद्याला आंबट पदार्थ सहन होत नाहीत म्हणून सर्वांनाच यापासून वंचीत ठेवणे अयोग्य आहे असे नमूद करावेसे वाटते.

पेरु खाताना काही काळजी घेणेही तेवढेच आवश्यक. भल्या पहाटे किंवा रात्रीच्या वेळी पेरु खाने टाळावे व फ्रिजमध्ये न ठेवणे चांगले. दुपारी जेवणानंतर पेरु खाने फायदेशीर ठरते. कच्चा पेरु बाधू शकतो. पिकलेला पेरु चांगला. पेरु खाताना अल्प प्रमाणात जिरे, मिरे पूड घालून खाल्ल्याने पेरु बाधण्याची शक्यता कमी होते व चवही सुधरते.

मित्रांनो आपण सिताफळ व पेरुचे गुण वाचले. या दोघांमध्ये सफरचंदपेक्षा जास्त चांगले घटक आढळतात. सिताफळ व पेरुच्या तुलनेत सफरचंद सर्वच बाबतीत मागे दिसते. मग प्रश्न असा पडतो की सफरचंद एवढे जास्त प्रसिद्ध कशामुळे ? केवळ एकच वैशिष्ट्य सर्वसमावेशकता. कोणालाही चालेल. कुठलाही आजार असेल तरीही. त्यामुळे जरी सर्व बाबतीत सफरचंद या दोन्ही फळापेक्षा कमजोर दिसत असेल तरीही कुठल्याही आजारी व्यक्तिस सफरचंद हेच फळ उत्तम. फायदा कमी करेल परंतु काहीही त्रास देणार नाही.

त्यामुळे एक संदेश आपणासाठी – आजारी व्यक्तींना निरोगी करण्यासाठी सफरचंदचा वापर करणे व निरोगी व्यक्तींनी आजारी पडू नयेत त्यांना सर्व पौष्टीक घटक मिळावेत म्हणून पेरुचा वापर करावा.

पोस्ट कॉपी पेस्ट आहे

Ride as much or as little, as long or as short as you feel. But Ride
11/12/2019

Ride as much or as little, as long or as short as you feel. But Ride

13/09/2019

“As a teenager, I was constantly bullied for being overweight, but I knew that I couldn’t stop living my life on account of others. I channelled their hate into motivation, and look where I am today!”

25/01/2018
11/01/2018

Address

Roha

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Laii Bhaari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share