02/09/2025
*महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या ग्रुपचे जलतरण प्रशिक्षक श्री महेश मिलके यांनी यावर्षीचा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले....
महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या ग्रुपचे जलतरण प्रशिक्षक श्री महेश मिलके यांनी यावर्षीचा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मिळाल्याबद्दल जलतरणपट्टू मध्ये उत्साहाचे वातावरण काल दि.15 ऑगस्ट २०२५ रोजी रत्नागिरी जिल्हयातील महेश मिलके स्विमिंग ग्रुपचे प्रशिक्षक / मार्गदर्शक यांचा शासनातर्फे गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री व मराठी भाषा राज्यमंत्री मा. डॉ. उदय जी सामंत यांच्याहस्ते पोलीस परेड ग्राउंड या ठिकाणी सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक तसेच रोख रक्कम या पुरस्काराच्या गुणवते नुसार गौरव समारंभ करण्यात आला. आजपर्यंतच्या इतक्या वर्षांच्या कालखंडातील जलतरण खेळ प्रकारामध्ये गुणवंत प्रशिक्षक म्हणून निवड झालेले प्रशिक्षक, मार्गदर्शक श्री महेश मिलके हे प्रथम व्यक्ती असून रत्नागिरी जिल्हातील विविध स्तरावदन सदर पुरस्कारप्राप्त प्रशिक्षाक, मार्गदर्शक यांचे अभिनंदन करण्यात येत आहे
पुरस्कारप्राप्त महेश मिलके यांच्याशी संवाद साधला असता,त्यांनी रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्य उद्योगमंत्री तथा मराठी भाषा रा ज्यमंत्री मा.डॉ.उदयजी सामंत यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच रत्नागिरी जिल्हयाचे जिल्हाधिकारी श्री देवेंदर सिंग व रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांचे व रत्नागिरी जिल्हयाचे क्री डा अधिकारि मा.श्री. विजय शिंदे याचे रत्नागिरी जिल्हयातील जलतरणपट्टू तयार करण्यासाठी विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले,
प्रशिक्षक श्री महेश शंकर मिलके यांचे वडील श्री शंकरराव मिलके यांनी त्यांना, राष्ट्रीय जलतरणपटू तयार केल्याचे हे अभिमानाने सांगितले, तसेच महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या संचालिका सौ.गौरी महेश मिलके, स्पोर्टस् अथॉरिटीज ऑफ इंडीयाचे (SAI) चे प्रमाणप्राप्त प्रशिक्षक तसेच राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय रौप्यपदक प्राप्त
कु करण महेश मिलके, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कु. तनया महेश मिलके यांचे मोलाचे सहकार्य
लाभल्याचे आवर्जून सांगितले तयेच महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या खेळाडू व त्यांचे पालक, रत्नागिती जिल्हयातील तमाम क्रिडाप्रेमी यांनी सहकार्य केल्यामुळेच मी या गुण गौरव पुरस्काराचा हक्कदार झालो त्यासर्व खेळाडू पालक हितचिंतक यांच्या प्रेरणेने मी या पुढेही रत्नागिरी जिल्हयाचे नाव अधिकाधिक उत्तम खेळाडू तयार करण्याची ग्वाही देऊन सत्काराचा विशेष आभारी सांगून सर्वांचे आभार मानले. गुणगौरवप्राप्त महेश मिलके यानी नेहमीच प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणारे त्यांचे मित्र मा. बिपीन बंदरकर, रत्नागिरी खबरदार चे संपादक हेमंत वणजू, यांचे विशेष आभार मानले.