Allaboutsportz

Allaboutsportz क्रीडा जगातील क्रांती

03/01/2023

पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत दुहेरीत भारताच्या रामकुमार रामनाथनचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

पुणे, 3 जानेवारी 2023: पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये दुहेरीत भारताच्या रामकुमार रामनाथन व मेक्सिकोच्या मिगुल एंजल रियास वारेला, एन श्रीराम बालाजी व जीवन नेद्दूचेझियन यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दुहेरीत पहिल्या फेरीत भारताच्या रामकुमार रामनाथन याने मिगुल एंजल रियास वारेलाच्या साथीत रोहन बोपण्णा व बोटीक व्हॅन दे झांडशुल्प यांचा 7-6(5), 6-7(4), 11-9 असा संघर्षपूर्ण पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. भारताच्या एन श्रीराम बालाजीने जीवन नेद्दूचेझियनच्या साथीत पुरव राजा व दिविज शरण यांचा 6-4, 6-3 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली. दुसऱ्या सामन्यात तीन वेळची ग्रँड स्लॅम विजेती जोडी राजीव राम आणि जॉय सलिसबरी या अव्वल मानांकित जोडीने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत सेबॅस्टियन बेझ आणि लुईस डेव्हिड मार्टिन्स यांचा 6-3, 7-6 (1) असा पराभव करून आगेकूच केली. फ्रान्सच्या सादिओ दुंबिया व फॅबियन रीबाऊल यांनी भारताच्या युकी भांब्री व साकेत मायनेनी यांचा 6-7(1), 7-5, 10-7. असा सुपरटायब्रकेमध्ये पराभव केला.

एकेरीत पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या भारताच्या रामकुमारला जागतिक क्रमवारीत 56व्या स्थानी असलेल्या स्पेनच्या पेड्रो मार्टिनेझकडून 6-3, 5-7, 3-6 असा पराभव पत्करावा लागला. अतीतटीच्या लढतीत रामकुमार याने सुरेख सुरूवात करत पेड्रो विरुध्द पहिला सेट 6-3 असा सहज जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या पेड्रो याने आक्रमक खेळ केला. सामन्यात 5-5 अशी बरोबरी असताना 12व्या गेममध्ये पेड्रोने रामकुमारची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत हा 7-5 असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये पेड्रोने आपला रंगतदार खेळ सूरू ठेवत सहाव्या गेममध्ये रामकुमारची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-3 असा जिंकून विजय मिळवला.

कवालिफायर इटलीच्या फ्लाविओ कोबोली याने वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या मुकुंद ससीकुमारचा 6-4, 7-5 असा पराभव करून त्याचे आव्हान संपुष्टात आणले. सामन्यात पहिल्या सेटमध्ये कोबोली याने मुकुंदची पाचव्या आणि सातव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली. पण कोबोलीने या सेटमध्ये फारशी संधी न देता हा सेट 6-4 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये कोबोलीने मुकुंदची 3ऱ्या, 7व्या आणि 11व्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 7-5 असा जिंकून विजय मिळवला.

अन्य लढतीत आठव्या मानांकित रशियाच्या अस्लन कारास्तेव याने स्पेनच्या पाबलो आडगुजरचा 6-1 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

दक्षिण आशियातील एकमेव एटीपी 250 स्पर्धा सूरू असलेल्या या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

याआधी काल सुमित नागल, मानस धामणे यांचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. आयएमजीच्या मालकीच्या आणि राईजन जागतिक स्तरावर व्यवस्थापन केलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेला टाटा समूहाचे प्रायोजकत्व लाभले आहे.

पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस  स्पर्धेचा मुख्य पुरुष दुहेरी ड्रॉ जाहीर. ही स्पर्धा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हा...
31/12/2022

पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचा मुख्य पुरुष दुहेरी ड्रॉ जाहीर. ही स्पर्धा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे 31 डिसेंबर 2022 ते 7 जानेवारी 2023 दरम्यान रंगणार आहे.

पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचा मुख्य पुरुष एकेरी ड्रॉ जाहीर. ही स्पर्धा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळु...
31/12/2022

पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचा मुख्य पुरुष एकेरी ड्रॉ जाहीर. ही स्पर्धा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे 31 डिसेंबर 2022 ते 7 जानेवारी 2023 दरम्यान रंगणार आहे.

Address

Pune

Telephone

+919665021117

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Allaboutsportz posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Allaboutsportz:

Share

Category