15/07/2025
स्पष्टीकरण
मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनाच्या वतीने, तळजाई टेकडीवर झालेल्या मारहाणीच्या घटनेबाबत काही प्रसारमाध्यमांमध्ये चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे की, या घटनेत आमच्या संकुलातील काही कुस्तीपटू किंवा विद्यार्थी सहभागी आहेत.
याबाबत आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की, मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातील कोणत्याही कुस्तीपटूचा किंवा विद्यार्थ्याचा त्या घटनेशी कोणताही संबंध नाही.
सदर घटनेत पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांवर मारहाण झाल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. आम्ही त्या विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूती व्यक्त करतो व त्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी आम्ही पूर्णपणे पाठिंबा दर्शवतो.
आमच्या संकुलातील सर्व खेळाडू शिस्तप्रिय व क्रीडाप्रेमी असून, ते नेहमीच कुस्ती व शारीरिक विकासावर लक्ष केंद्रित करतात. कोणतीही चुकीची माहिती समाजात गैरसमज पसरवू शकते, म्हणून सर्व प्रसारमाध्यमांना विनंती आहे की त्यांनी योग्य व पडताळून घेतलेलीच माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी.
मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलन नेहमीच खेळ, शिस्त व सामाजिक बांधिलकी यांचे संवर्धन करण्यासाठी कार्यरत आहे आणि पुढेही राहील.
धन्यवाद!
व्यवस्थापक,
मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलन, पुणे
पै.पंकज सुरेशदादा हारपुडे.
पै.महेश ज्ञानेश्वर मोहोळ