Kustimallavidya कुस्ती-मल्लविद्या

  • Home
  • India
  • Pune
  • Kustimallavidya कुस्ती-मल्लविद्या

Kustimallavidya कुस्ती-मल्लविद्या Kustimallavidya - The Legacy of Indian Wrestling 🇮🇳🤼‍♂️ Dedicated to India's traditional wrestling, legendary akhadas & wrestlers' stories.
(4007)

Explore history, techniques & inspiring journeys This is the official page of kustimallavidya orgnisation of maharashtra (india). we are goverment of india registered orgnisation working last 10 years sprading awareness of wresling of maharashtra

कुस्तीसम्राट अस्लम भाऊ काझी यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...💐जुबान का सच्चालंगोट का पक्का...ही बिरुदावली सार्थ कर...
27/05/2026

कुस्तीसम्राट अस्लम भाऊ काझी यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...💐

जुबान का सच्चा
लंगोट का पक्का...

ही बिरुदावली सार्थ करणारे व्यक्तिमत्व म्हणजे अस्लम भाऊ होय.

पैसा,कीर्ती,समाजात नाव,जनमांणसांच्या हृदयात स्थान असूनही आपली मर्यादा कधीही न ओलांडणारे अस्लम भाऊ...

त्याकाळात एक गदा म्हणजे आयुष्याची कमाई हे समीकरण असायचे त्याकाळात 51 गदा आणि शेकडो किताब आपल्या नावावर करणारा महायोद्ध म्हणजे अस्लम भाऊ...

जात पात, पंथ,भेद या परिघाच्या पुढे जाऊन फक्त प्रतिभा,काम पाहून माणसांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देणारे अस्लम भाऊ....

गुरुजन,वडीलधारी,साधू संत यांच्या प्रति नम्र असणारे अस्लम भाऊ....

ज्या कुस्तीने नाव,प्रतिष्ठा दिली त्याच खेळासाठी आयुष्य समर्पित करणारे अस्लम भाऊ....

माझ्या नजरेतून अस्लम भाऊ म्हणजे म्हणजे एक चतुरंग व्यक्तिमत्व.. लहानांसोबत लहान होणारे आणि जेष्ठ मंडळीत भीष्मासारखे आपले स्थान अढळ ठेवणारे...न पटणाऱ्या गोष्टी दुर्लक्षीत करणारे आणि केवळ टॅलेंट,काम बघून लोकांना आपलेसे करणारे...

अस्लम भाऊ आपणास जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...💐

आपणास उत्तम आरोग्य,उदंड आयुष्य,यश कीर्ती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना...💐

पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ

व्हिएतनाम येथे झालेल्या U23 Asian Championships 2026 स्पर्धेत भारताच्या भाग्यश्री फंड-कोळी हिने शानदार कामगिरी करत 62 कि...
26/05/2026

व्हिएतनाम येथे झालेल्या U23 Asian Championships 2026 स्पर्धेत भारताच्या भाग्यश्री फंड-कोळी हिने शानदार कामगिरी करत 62 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. 🇮🇳🥇

अंतिम सामन्यात भाग्यश्रीने कझाकस्तानच्या टायनिस डुबेक हिचा 4-0 असा पराभव करत भारतासाठी सुवर्ण जिंकले. 🇰🇿

उपांत्य फेरीत भाग्यश्रीने किर्गिस्तानच्या कालमिरा बिलिमबेक किझी हिला 12-2 अशा मोठ्या फरकाने मात देत अंतिम फेरीत धडक मारली. 🇰🇬

याच गटातील दुसऱ्या उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या टायनिस डुबेक हिने उझबेकिस्तानच्या मियासार कुशमुराटोव्हा हिला 18-7 अशा फरकाने पराभूत केले होते. तसेच कांस्यपदकाच्या लढतीत उझबेकिस्तानच्या मियासार कुशमुराटोव्हा हिने किर्गिस्तानच्या कालमिरा बिलिमबेक किझी हिचा 10-0 असा एकतर्फी पराभव केला. 🇺🇿

भारतीय महिला कुस्तीमध्ये भाग्यश्री फंड हिच्या या सुवर्णमयी कामगिरीमुळे देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 🇮🇳🤼‍♀️ कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन..💐

Team Kustimallavidya

व्हिएतनाम येथे झालेल्या U23 Asian Championships 2026 स्पर्धेत भारताच्या अक्षय तानाजी ढेरे याने 57 किलो वजन गटात सुवर्णपद...
26/05/2026

व्हिएतनाम येथे झालेल्या U23 Asian Championships 2026 स्पर्धेत भारताच्या अक्षय तानाजी ढेरे याने 57 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावत देशाचा तिरंगा उंचावला. 🇮🇳🥇

अंतिम सामन्यात अक्षयने कझाकस्तानच्या येलामन अमांगेल्दी याचा 4-2 असा पराभव करत आशियाई विजेतेपदावर नाव कोरले. 🇰🇿

या स्पर्धेत मंगोलियाच्या लुवसंदग्वा एरडेनेदावा आणि किर्गिस्तानच्या बायामान केरिमबेकोव यांनी संयुक्तपणे कांस्यपदक मिळवले. 🇲🇳 🇰🇬

अक्षय तानाजी ढेरे याच्या या दमदार आणि सुवर्णमयी कामगिरीमुळे भारतीय कुस्तीला मोठा अभिमान मिळाला असून देशभरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 🇮🇳🤼‍♂️ कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे त्याचे हार्दिक अभिनंदन

धन्यवाद
Team Kustimallavidya

वाढदिवसानिमित्त मिळालेल्या आपल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी धन्यवाद…! 🌺आपण व्यक्त केलेला स्नेह, आपुलकी आणि आशीर्वाद हेच माझ्य...
25/05/2026

वाढदिवसानिमित्त मिळालेल्या आपल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी धन्यवाद…! 🌺

आपण व्यक्त केलेला स्नेह, आपुलकी आणि आशीर्वाद हेच माझ्यासाठी खरे धन आहे… 🙏✨

मनःपूर्वक आभार..! 💐

आपलाच
गणेश 🙏

पुणे जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाचे कार्याध्यक्ष,पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य✨ मा.श्री.डॉ.ऋतुराज भैय्या ...
24/05/2026

पुणे जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाचे कार्याध्यक्ष,
पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य

✨ मा.श्री.डॉ.ऋतुराज भैय्या काळे ✨

आपणास वाढदिवसानिमित्त
हार्दिक शुभेच्छा..! 💐
आपल्या आयुष्यात उत्तम आरोग्य,
दीर्घायुष्य, सुख-समृद्धी व
यशाची अखंड भरभराट होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना..! 🙏

|| भावपूर्ण श्रद्धांजली ||कै. पै. सुरेश बाबुराव गायकवाड यांच्या दुःखद निधनाने कुस्ती क्षेत्रासह सामाजिक व मित्रपरिवारात ...
22/05/2026

|| भावपूर्ण श्रद्धांजली ||

कै. पै. सुरेश बाबुराव गायकवाड यांच्या दुःखद निधनाने कुस्ती क्षेत्रासह सामाजिक व मित्रपरिवारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या प्रेमळ स्वभावाने, जिव्हाळ्याच्या नात्यांनी आणि समाजासाठी केलेल्या कार्याने अनेकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले होते.

“तुमचं असणं आमच्यासाठी सर्वकाही होतं,
ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होतं...
आज सर्वकाही असण्याची जाणीव आहे,
पण तुम्ही नसणं ही मोठी उणीव आहे...”

ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना...💐🙏

दशक्रिया विधी
रविवार, दि. २४ मे २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता
स्थळ – खराडी गावठाण स्मशान भूमी, खराडी, पुणे

भावपूर्ण श्रद्धांजली… 🙏

21/05/2026

कार्वे कुस्ती मैदान समिती यांच्या संयुक्त आयोजनाने

व कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने

मुलांची 16 ते 21 वर्षे खालील वयोगट

श्रीधानाई केसरी (मॅट वरील) राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा सन - 2026

कार्वे तालुका कराड जिल्हा सातारा येथे

रविवार 24 मे 2026 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत.

बक्षिस स्वरूप खालीलप्रमाणे...

21 वर्षाखालील ओपन गटासाठी महाराष्ट्र केसरी स्वरूपातील चांदीची गदा व श्रीधानाई केसरी किताब आणि रोख रक्कम मानधनस्वरूपात.

25 किलो वजनगट (सर्व वयोगटासाठी) प्रथम क्रमांकासाठी सायकल व रोख रक्कम मानधनस्वरूपात

सर्वच वयोगटातील प्रथम व द्वितीय क्रमांकासाठी स्पोर्ट्स बॅग,सन्मानचिन्ह, मेडल, शालेय वस्तू आणि खुराकाचे साहित्य यासह रोख रक्कम मानधनस्वरूपात.

इतर वजन गट व वयोगटासाठी कृपया जाहिरात पहावी.

सर्व कुस्ती पट्टू, पंच कमिटी ,वस्ताद मंडळी यांच्यासाठी कुपनाद्वारे शुद्ध शाकाहारी जेवणाची सोय आयोजकाद्वारे करण्यात आलेली आहे.

स्पर्धेचे ठिकाण
सप्तपदी मंगल कार्यालय
वडगाव हवेली
कार्वे चौकी पासून 1 किलोमीटर अंतरावर.

अधिक माहितीसाठी संपर्क - 7020690207
8788355514

सदर कुस्ती स्पर्धेचे धावते समालोचन प्रसिद्ध कुस्ती समालोचक रोहन केंजळे कटापूरकर करतील

आयोजक
पैलवान यशवंत थोरात (सह्याद्री केसरी)
जय हनुमान कुस्ती आखाडा,कुस्ती कोच कार्वे
तालुका कराड जिल्हा सातारा

हार्दिक अभिनंदन...💐
18/05/2026

हार्दिक अभिनंदन...💐

हार्दिक अभिनंदन..💐
18/05/2026

हार्दिक अभिनंदन..💐

*पैलवान मारुती भाऊ जाधव - वाढदिवस विशेष*कुस्ती म्हणजे एक परंपरा, एक निष्ठा आणि एक जीवनपद्धती आहे. या परंपरेला जपणारे आणि...
17/05/2026

*पैलवान मारुती भाऊ जाधव - वाढदिवस विशेष*

कुस्ती म्हणजे एक परंपरा, एक निष्ठा आणि एक जीवनपद्धती आहे. या परंपरेला जपणारे आणि कुस्तीप्रेमींना प्रोत्साहन देणारे अनेक महानायक आपल्या समाजात जन्म घेतात. अशाच एक तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचे नाव म्हणजे पैलवान मारुती भाऊ जाधव.

मारुती भाऊ जाधव हे कुस्ती क्षेत्रात एक अभिमानास्पद नाव आहे. त्यांनी फक्त स्वतःची ओळख नव्हे, तर कुस्ती मल्लविद्या आणि समाज कार्य यांचा संगम साधत आपल्या प्रयत्नांनी कुस्तीच्या क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे.

कुस्तीप्रेमींना एकत्र आणण्यासाठी त्यांनी 'पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य कुस्ती प्रेमी संघटना' ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कुस्ती मैदाने, स्पर्धा आणि समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. पैलवानांच्या सुखदुःखाला नेहमीच उभे राहून त्यांनी कुस्ती समाजात एक अतूट विश्वास निर्माण केला आहे.

मारुती भाऊ जाधव हे न्यू मोतीबाग तालीम, कोल्हापूर येथे वस्ताद हिंदकेसरी अर्जुनवीर गणपतराव आंदळकर आबांचे पट्ट शिष्य म्हणून कुस्ती क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली. त्यांनी शारीरिक शक्ती व मनोबल आणि निष्ठेचाही उत्तम समन्वय साधला आहे. त्यांच्या मेहनतीने आणि संयमाने कुस्ती क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

मारुती भाऊ हे एक पैलवान, एक मार्गदर्शक, एक सच्चा मित्र आणि समाजसेवक आहेत. त्यांनी अनेक पैलवानांच्या सुखदुःखात साथ दिली आहे. कुस्ती क्षेत्रातील तुफानी आणि सूर्योदय व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे.

त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करण्याची ही संधी आहे.कुस्ती मल्लविद्या महासंघाकडून मारुती भाऊंना हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि त्यांच्या कुस्तीप्रेमाला नवा उंची मिळो हीच सदिच्छा!

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ

#पैलवान_मारुती_भाऊ_जाधव #कुस्ती #मल्लविद्या #कोल्हापूर #वाढदिवस_शुभेच्छा गौरव मराठी_क्रीडा

16/05/2026

🔥 गाजतंय पुण्यात... वाजतंय पुण्यात... 🔥

लाल मातीचा थरार, ढोल-ताशांचा गजर आणि कुस्तीचा मराठमोळा अभिमान आता प्रत्येकाच्या ओठांवर! ❤️‍🔥💪

🎵 अखिल दत्तवाडी अजिंक्यपद २०२६ चे अधिकृत शीर्षक गीत 🎵

“मानाचं मैदान, लाल मातीची शान...” 🚩

१६ वर्षांची गौरवशाली परंपरा, निलेश गायकवाड आणि गायकवाड बंधूंची निस्वार्थ सेवा, आणि कुस्तीप्रेमींच्या प्रेमातून घुमणारं हे दमदार गीत आता Reels वर धुमाकूळ घालणार! 🔥

जय भवानी! 🚩
जय शिवाजी! 🚩
हर हर महादेव! 🔱

FBReels PuneKushti लालमाती कुस्ती जयभवानी जयशिवाजी हरहरमहादेव MarathiSong WrestlingCulture Maharashtra

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kustimallavidya कुस्ती-मल्लविद्या posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category