Pravinpowerplay

क्रिकेटला जेंटलमनचा खेळ म्हणतात, हे काही चुकीचे नाही. 21 वर्षांपुर्वी क्रिकेटच्या इतिहासात एक असा रेकॉर्ड घडला होता जो प...
08/07/2025

क्रिकेटला जेंटलमनचा खेळ म्हणतात, हे काही चुकीचे नाही. 21 वर्षांपुर्वी क्रिकेटच्या इतिहासात एक असा रेकॉर्ड घडला होता जो पाहून अनेकांना वाटले होते हा रेकॉर्ड जास्त काळ टिकेल. तो रेकॉर्ड म्हणजेच लेजेंड क्रिकेटर ब्रायन लारा याने इंग्लंड विरुद्ध केलेल्या 400* धावा. त्यानंतर मॅथ्यू हेडन, वीरेंदर सेहवाग, डेव्हिड वॉर्नर, युनूस खान, क्रिस गेल, हाशिम आमला अशा अनेक खेळाडूंना हा रेकॉर्ड मोडण्याची संधी मिळाली होती. परंतु, हा रेकॉर्ड तसाच अबाधित राहिला.

आता हाच रेकॉर्ड मोडण्याचा पूर्ण चान्स साऊथ आफ्रिकेचा कर्णधार विल्यम मल्डर याच्याकडे होता. झिंबाब्वे विरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात पहिल्या दिवशी 264 धावा करून नॉट आउट राहिला होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेंव्हा सर्व क्रिकेट प्रेमींना वाटत होते की आज काही तरी मोठे घडणार. विल्यम मल्डर देखील तितक्याच सुंदररित्या खेळत 300, 350 चा पल्ला गाठला. ब्रायन लाराचा रेकॉर्ड धोक्यात आला असतानाच लंच ब्रेक झाला आणि विल्यम मल्डर 367 धावांवर नॉट आउट राहिला. अनेकांना वाटले तो परत येऊन सहज 400 धावांचा पल्ला गाठेल. पण त्याने कोच सोबत चर्चा करून इनिंग घोषित करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण अशी संधी खूपच कमी क्रिकेटर्सना मिळते. या निर्णयाबद्दल सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. कोणी म्हणत आहे झिम्बाब्वे विरुद्ध रेकॉर्ड केला असता तर त्याचे महत्व राहिले नसते. कोणी म्हटले त्याने हा रेकॉर्ड मोडायला हवा होता. पण मल्डरला दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर विचारले असता तो म्हणाला, "ब्रायन लारा महान खेळाडू आहे, त्याचा रेकॉर्ड जपून राहिला पाहिजे आणि तो जपून राहिला आहे." त्याच्या या व्यक्तव्याचे अनेकजण कौतुक करीत आहेत.

वसीम अकरम म्हणाले: 🗣️🗣️"१३ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने सगळ्यांची मने जिंकली आहेत. IPL नंतर आता इंडिया ए संघातून खेळताना ...
16/06/2025

वसीम अकरम म्हणाले: 🗣️🗣️
"१३ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने सगळ्यांची मने जिंकली आहेत. IPL नंतर आता इंडिया ए संघातून खेळताना त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १२० धावा केल्या आहेत. त्याच्या ९० चेंडूंमध्ये १९० धावांच्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशा प्रकारचा खेळाडू संपूर्ण पाकिस्तानमध्ये सापडणार नाही. किती लोक यावर सहमत आहेत?"

वैभव सूर्यवंशीचं वय जरी फक्त १३ वर्षं असलं तरी त्याची क्रिकेटमधली समज आणि मैदानावरची शांतता कोणत्याही अनुभवी खेळाडूला लाजवेल अशी आहे. IPL मध्ये त्याने आपल्या दमदार फटक्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं आणि आता इंडिया ए संघातही तो आपला ठसा उमटवत आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये त्याने केवळ ९० चेंडूंमध्ये १९० धावा फटकावत एक अभूतपूर्व कामगिरी केली. या खेळीत त्याचे ड्राईव्ह्स, पुल शॉट्स आणि क्लासिकल फूटवर्क पाहून सर्व क्रिकेटप्रेमी थक्क झाले. ही खेळी एका अशा वयात झाली आहे जेव्हा अनेक खेळाडू अजूनही प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मूलभूत गोष्टी शिकत असतात.

क्रिकेटमधील दिग्गज, वसीम अकरम यांचं हे विधान की "अशा प्रकारचा खेळाडू संपूर्ण पाकिस्तानमध्ये सापडणार नाही", हेच दाखवून देतं की वैभवची तुलना आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रतिभावान खेळाडूंशी होत आहे. हे त्याच्या भविष्यकालीन यशाची नांदी मानली जात आहे.

वैभव सूर्यवंशीच्या फिटनेस, मानसिक ताकद आणि खेळावर असलेल्या एकाग्रतेमुळे त्याला लवकरच भारताच्या मुख्य संघात स्थान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापन त्याच्यावर विशेष लक्ष केंद्रित करत आहेत.

त्याचं वय, त्याची शिस्त, आणि मोठ्या सामन्यांमध्येही न घाबरता आत्मविश्वासाने खेळण्याची शैली ही युवा क्रिकेटपटूंना एक आदर्श ठरते. वैभव सूर्यवंशीसारख्या खेळाडूंमुळे भारतीय क्रिकेटचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे, यात शंका नाही.

टेंबा बवूमा एक झुंजार नेतृत्व ! 😊जखमी झाला,घायाळ झाला पण तो लढला ♥️टेंबा बवुमाला त्याच्या शरीरयष्टी वरून सगळेच ट्रोल करत...
14/06/2025

टेंबा बवूमा एक झुंजार नेतृत्व ! 😊
जखमी झाला,घायाळ झाला पण तो लढला ♥️
टेंबा बवुमाला त्याच्या शरीरयष्टी वरून सगळेच ट्रोल करतात, जॉन बनेगा डॉन वगैरे म्हणत त्याची नेहमीच मजा घेतली जाते,पण महत्वाच्या मॅचेस मध्ये वारंवार चोक करणाऱ्या आपल्या आफ्रिका संघासाठी भक्कम भिंत म्हणून उभा राहिला आहे टेंबा !
ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड वर सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पयनशिपच्या फायनल मॅच मध्ये आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा ने ओपनर बॅट्समन ऍडम मारक्रमच्या साथीने विजयाकडे आगेकूच केली आहे.
पायाच्या स्नायू मध्ये प्रचंड वेदना होत असताना सुध्दा कॅप्टन टेंबा बवूमा सिंगल डबल धावा घेत आपल्या संघाला विजयाकडे नेण्यासाठी लढत आहे .
तिसऱ्या दिवस अखेर आफ्रिकेची 213-2 धावसंख्या आहे.
ऐतिहासिक विजयासाठी आफ्रिकेला फक्त 69 धावांची गरज आहे.
बवुमा 65 धावांवर नाबाद आहे तर मारक्रम सुद्धा शानदार शतक झळकावून नाबाद आहे.
मारक्रमचे कौतुक आहेच पण प्रचंड वेदना सहन करून पण खेळपट्टी वर टिकून राहणारा 'सर टेंबा बवूमा' मनाला अधिक भावला.

29/05/2025

चेतन शर्मा यांनी ३१ ऑक्टोबर १९८७ रोजी नागपूर येथे झालेल्या १९८७ क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ऐतिहासिक हॅट्रिक घेतली. ही हॅट्रिक वनडे क्रिकेट आणि विश्वचषक इतिहासातील पहिली भारतीय हॅट्रिक होती .

18/10/2024
भारताची पॅरालिंपिकमध्ये ५६ वर्षांमधली सर्वोत्तम कामगिरी,७ गोल्ड 🥇 मेडल्ससह एकूण २९ मेडल्स जिंकले.
08/09/2024

भारताची पॅरालिंपिकमध्ये ५६ वर्षांमधली सर्वोत्तम कामगिरी,
७ गोल्ड 🥇 मेडल्ससह एकूण २९ मेडल्स जिंकले.

मनू भाकर 🤝 सूर्यकुमार यादव
25/08/2024

मनू भाकर 🤝 सूर्यकुमार यादव

24/08/2024

Shikhar Dhawan

ही आहे मारिया आंद्रेत्जि़क. २५ वर्षांची पोलॅन्डची खेळाडू. भालाफेकमधे २०१६च्या रिओ ऑलम्पिकला तिचं पदक अवघ्या २ सेंटीमीटरन...
23/08/2024

ही आहे मारिया आंद्रेत्जि़क. २५ वर्षांची पोलॅन्डची खेळाडू. भालाफेकमधे २०१६च्या रिओ ऑलम्पिकला तिचं पदक अवघ्या २ सेंटीमीटरने हुकलं. २०१८ उजाडला आणि कळलं की तिला हाडांचं कॅन्सर आहे. टोकियो ऑलम्पिकमधे सहभागी होण्याचं स्वप्न जवळपास संपुष्टात आलेलं.

सुदैवाने ऑपरेशन यशस्वी झालेत आणि मारिया परत फील्डवर आली. २०२०च्या समर ऑलम्पिकला सिल्वर मेडल पटकावलं आणि टोकियोचे दारही उघडलेत. टोकियोत तिने स्वतःचा रेकॉर्ड आणि पोलॅन्डचा राष्ट्रीय रेकॉर्ड तर मोडलाच; पण त्याच सोबत विश्वविक्रमाच्या यादीत आजतागायतची तिसरी सर्वोत्तम कामगिरी करत तिने सिल्वर मेडलही पटकावलं.

मारिया आंद्रेत्जि़क जेव्हां टोकियोत ही कामगिरी करत होती, तेव्हां मायदेशी पोलॅन्डमधे एक लहान मुलाचे आईबाप हैराण होत होते. त्यांच्या ८ महिन्याच्या मिलोस्ज़ेक मलिसाला हृदयाच्या एक खूप दुर्मिळ विकार आहे. ह्या मुलाच्या आजारावर उपचार एकच - हृदयावर शल्यक्रिया. पण हे विकार असं आहे की इतक्या लहान पोरावर ह्या विकाराची शल्यक्रिया करायला अक्ख्या पोलॅन्डमधे एकही शल्यचिकित्सक किंवा हॉस्पिटल तयार नव्हतं.

अनेक ठिकाणी नकार पचवल्यावर अमेरिकेत स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरला ह्या शल्यक्रियेची व्यवस्था असल्याचं कळलं. मात्र तिकडे संपर्क केल्यावर त्यात ३,८५,००० डॉलर म्हणजे भारतीय चलनात जवळपास ३ कोटी रुपयांचा खर्च ऐकून मिलोस्ज़ेकच्या आई बाबांच्या तोंडाचं पाणी पळालं.

मिलोस्ज़ेकच्या आई-वडिलांनी crowd funding साठी प्रयत्न केलेत पण त्यात निम्मे पैसेच एकत्र झालेत. crowd fundingच्या नियमांनुसार दिलेल्या कालावधीत पूर्ण रक्कम एकत्र होऊ शकली नाही, तर crowd funding फोरम दानदात्यांना त्यांचे पैसे परत करते. मिलोस्ज़ेकच्या आईवडिलांवरही ही वेळ येऊन ठेपली. कॅम्पेन संपायला अगदी मोजके दिवस उरले होते. त्यांनी आवश्यक अशी अर्धी रक्कम अजून एकत्र करण्यासाठी fund raiserच्या पोस्टवर हाक मारली - "आमच्या मिलोस्ज़ेकला वाचवा."

आणि मारियाने ही हाक ऐकली.

मारियाकडे एवढे पैसे तर नव्हते, पण तिच्याकडे दोन दुर्लभ गोष्टी होत्या. एक - मदत करण्याची अदम्य इच्छाशक्ती, आणि दुसरं - तिचं दहा बारा दिवसांपूर्वी जिंकलेलं ऑलम्पिकचं सिल्वर मेडल. तिने तडक ते मेडल मिलोस्ज़ेकच्या उपचारासाठी लिलावात काढलं.

हे मेडल नाही, तिचं स्वप्न होतं. जे स्वप्न २०१६ला हुकलं होतं, २०१८ला पूर्णपणे भंगच झालेलं, आणि २०२१मधे हे स्वप्न पाच वर्षांची मेहनत, साधना, तपश्चर्या, ध्यास लावून मेडलच्या रुपात तिने साकारलं होतं. अटीतटीच्या परिस्थितीत अनोळखी माणसांसाठी तेच तिने विकायला काढलं.

पोलॅन्डच्या एका सुपरमार्केट चेन झाबका पोल्स्काने हे मेडल विकत घेतलं सव्वा लाख डॉलर्समधे म्हणजे साधारण ९३ लाख रुपयांत, हे पैसे थेट फंड रेजर संस्थेकडे जमाही केलेत. पण झाबका पोल्स्काचे मालक इकडेच थांबले नाहीत. त्यांने मारियाच्या मदतीच्या भावनेला तोडीसतोड काम केलं. त्यांनी मारियाचा सिल्वर मेडल तिला परत दिला, आणि सांगितलं - परत कधी, कुणाचं जीव वाचवावेसे वाटल्यास अश्या गोष्टी तुझ्याच हाताशी असाव्यात.

टोकियो ऑलम्पिकमधे ३५० इव्हेंट्स म्हणजे साधारण हजारभर पदक विजेता होते. आपल्या देशाला ७ पदक आलेत, म्हणून त्यांची नावं आपल्याला माहिती आहेत जेव्हां ७० पदक येतील तेव्हां नावं लक्षात राहणे कठीण होईल. पण मारिया आंद्रेत्जि़कसारखे खेळाडू खेळावर, रिकॉर्डबुक्समधे आपलं नाव लिहितातच, पण इतिहासावरही आपलं नाव कोरून ठेवतात. ते नाव विसरत नाहीत.

पूर्वीच्या काळात भाले हृदयात खुपसून प्राण घेतले जात असे. मारियाने भाला फेकून प्राण वाचवले, आणि मारियाच नाही तर झाबका पोल्स्कानेही हृदय जिंकले. ह्या घटना अश्या असतात, ज्या आपल्याला बदलायला भाग पाडतात, जगाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देतात, ज्या खेळांवर प्रेम करायला भाग पाडतात.

ही मुलगी माझी लेक, किंवा लहान बहीण असती, तर खांद्यावर घेऊन नाचलो असतो. नाहीए, तरी हरकत नाही, माणूस म्हणून तिचा अभिमान आहेच... तिची माहिती लक्षात ठेवा,
नाव - मारिया आंद्रेत्जि़क
देश - पोलॅन्ड
खेळ - जेवलीन थ्रो
पदक - सिल्वर

- श्रीकांत केकरे

भारतासाठी अभिमानाचा क्षण !निरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पराक्रम गाजवत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ...
08/08/2024

भारतासाठी अभिमानाचा क्षण !

निरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पराक्रम गाजवत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ८९.४५ मीटर लांब भाला फेकत निरजने रौप्य पदकावर भारताचे नाव कोरले.
संपूर्ण देशासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण असून या कामगिरी बद्दल निरज चोप्राचे हार्दिक अभिनंदन !

Address

Pune

Telephone

+917397979775

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pravinpowerplay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pravinpowerplay:

Share

Category