08/06/2018
www.tenniscricket.in/Live
*लेजन्ड ट्रॉफी २०१८*
*अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब* यांच्या माध्यमातून, घाटकोपर पश्चिमे कडील भटवाडी नगरीतील दत्ताजी साळवी क्रिडांगणामध्ये प्रत्येक वर्षी हा रब्बर बॉल क्रिकेटचा भव्य महोत्सव पार पडला जातो, यंदा या स्पर्धेचं *५ वे* वर्ष पार पाडत आहे,
ही स्पर्धा भरावण्यामागचे दोनचं उद्देश, टेनिस क्रिकेट विश्वातील लेजन्ड खेळाडूंमुळे टेनिस क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस म्हणून त्या लेजन्ड खेळाडूंचा सन्मान म्हणून ही स्पर्धा भरवली जाते, ज्या लेजन्ड खेळाडूचा *५० वा* वाढदिवस असेल, तर त्या खेळाडूचा तो *५० वा* वाढदिवस देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पार पाडला जातो,
या स्पर्धेचा दुसरा उद्देश म्हणजे *शिस्तीचे पालन.*
स्पर्धा वेळेवर सुरू करणे, सामना सुरू होण्या ३० मिनिटं अगोदर संघाची उपस्थिती, प्रत्येक सामना ६ ते ८ षटकांचा, कोणत्याही प्रकारचा वाद-विवाद न होता स्पर्धा वेळे अभावी पार पाडणे,
या सर्व प्रकारची कडक शिस्त या स्पर्धेच्या माध्यमातून पहाव्यास मिळते,
या स्पर्धेच्या माध्यमातून आतापर्यंत मागील चार वर्षात,
विश्वापिता सर.उमेश मांजरेकर, सर.शेखर पेडणेकर, सर.संदीप दळवी,सर.मधुकर सोनवणे,सर.उमेश मालवणकर,सर.सुनील इंदुलकर, सर.संतोष जगताप, सर.सुरेश गडेकर यांसारख्या नामांकित दिग्गज लेजन्ड खेळाडूंचा सुवर्ण मोहोत्सव पार पाडण्यात आला,
तर, यंदा या स्पर्धेच्या पाचव्या वर्षात या स्पर्धेच्या माध्यमातून सर.चंद्रकांत शिंदे,सर.करूणाकरन कोटीयन,सर.भरत वाघेला,सर.शाम वागळे, सर.विजय तळेकर यांसारख्या दिग्गज लेजन्ड खेळाडूंचा सुवर्ण मोहोत्सव पार पडणार आहे,
संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण, www.tenniscricket.in/Live या लिंक च्या माध्यमातून लाईव्ह पाहता येणार आहे,
तर मित्रानो,
पाहत रहा, ऐकत रहा, या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घरबसल्या घेत रहा.
स्पर्धेचे ठिकाण :- दत्ताजी साळवी क्रीडांगण, भटवाडी, घाटकोपर - (प), मुंबई :- ४०० ०८४
Article By - (baba ) Amit Thawal