रॉयल मालवणी कला क्रीडा आरोग्य Reg.No.F-0005468 SDD

  • Home
  • India
  • Malvan
  • रॉयल मालवणी कला क्रीडा आरोग्य Reg.No.F-0005468 SDD

रॉयल मालवणी  कला क्रीडा आरोग्य Reg.No.F-0005468 SDD ROYAL MALWANI IS NOT JUST A TRUST BUT BOND WHICH CONNECT DOCTORS WITH PURE HEART AND BROTHERS WITH DIFFERENT THOUGHTS BUT SAME AND UNIQUE VISION....

अथर्व आयुर्वेदा आणि पंचकर्म सेंटर आणि रॉयल मालवणी सिंधुदुर्ग आयोजित अंतर्गत मोफत पंचकर्म सहाय्यक कार्यशाळा दि 26जुलै 202...
26/07/2026

अथर्व आयुर्वेदा आणि पंचकर्म सेंटर आणि रॉयल मालवणी सिंधुदुर्ग आयोजित अंतर्गत मोफत पंचकर्म सहाय्यक कार्यशाळा दि 26जुलै 2026 रोजी ओरोस येथे पार पडली. यावेळी डॉ श्री व सौ परब, डॉ श्री व सौ हुले आणि डॉ साळुंखे व मान्यवर उपस्थित होते.

आज दिनांक 15 मे 2026 रोजी जनता विद्या मंदिर त्रिंबक तालुका मालवण येथे जागृत उन्नती मंडळ त्रिंबक व सिंपन प्रतिष्ठान यांच्...
15/05/2026

आज दिनांक 15 मे 2026 रोजी जनता विद्या मंदिर त्रिंबक तालुका मालवण येथे जागृत उन्नती मंडळ त्रिंबक व सिंपन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सह आयोजक म्हणून रॉयल मालवणी सिंधुदुर्ग या संस्थेने आपला हातभार लावला. डॉ. प्रथमेश वालावलकर, डॉ रोहित डगरे यांनी होमिओपॅथिक तज्ञ व जनरल मेडिसिन तथा आहार मार्गदर्शन यावर मार्गदर्शन केले आणि रुग्ण तपासणी केली. या शिबिराच्या व्यवस्थापनामध्ये डॉ स्वप्निल भोगटे, आकाश मेस्त्री, सौ.प्रियांका सकपाळ, चैतन्य वायंगणकर, डॉ सिद्धू सकपाळ, श्री सुरेंद्र सकपाळ, सौ मनुश्री सकपाळ , श्री मंदार सकपाळ, श्री सिताराम सकपाळ, कु. नूतन सावंत यांचा मोलाचा हातभार लाभला. या शिबिरामध्ये मधुमेह तपासणी, यूरिक ॲसिड तपासणी, रक्त तपासणी, नेत्र चिकित्सा व चष्मे वाटप, अस्थिरोग, स्त्रीरोग, गर्भाशयाच्या कर्करोगाची चाचणी, शल्य चिकित्सा, हृदयरोग, कार्डिओग्राम इत्यादी सेवा मोफत ठेवण्यात आल्या होत्या. या शिबिरामध्ये ज्यांना शस्त्रक्रियेची गरज लागणार आहे, त्यांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे, या शिबिराचा 178 रुग्णांनी फायदा घेतला. रॉयल मालवणी सिंधुदुर्ग कला क्रीडा आरोग्य या संस्थेचा मे महिन्यातील हा एक अभिनव उपक्रम राहिला आहे.

12/05/2026

महाशिबीर 2026
सहाय्यक व्यवस्थापक : रॉयल मालवणी सिंधुदुर्ग

29/04/2026

घेतला वसा टाकणार नाही 😇😇😇

धन्यवाद कांबळी सर!!

29/04/2026

Reviews about Karaoke compition arranged by ROYAL MALWANI सिंधुदुर्ग

Royals....
28/04/2026

Royals....

जिल्हास्तरीय खुली कराओके स्पर्धा आचरा येथे उत्साहात संपन्नआचरा (ता. मालवण) : रॉयल मालवणी सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय ...
26/04/2026

जिल्हास्तरीय खुली कराओके स्पर्धा आचरा येथे उत्साहात संपन्न
आचरा (ता. मालवण) : रॉयल मालवणी सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय खुली कराओके गीत, गायन स्पर्धा दि. २५ एप्रिल २०२६ रोजी लौकिक सांस्कृतिक भवन, आचरा येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकूण ३६ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. प्रथम क्रमांकासाठी रॉयल मालवणी संस्थेकडून आकर्षक चषक तसेच डॉ. धनंजयजी रासम यांच्या हस्ते रु. ६६६६/- प्रदान करण्यात आले. द्वितीय क्रमांकासाठी आकर्षक चषक व श्री. संतोषजी कोदे यांच्याकडून रु. ४४४४/- देण्यात आले, तर तृतीय क्रमांकासाठी आकर्षक चषक व श्री. संजयजी वेंगुर्लेकर यांच्या हस्ते रु. २२२२/- देण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक व मेडल्स देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेत कु. वैष्णवी चव्हाण हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक श्री. राकेश मिठबावकर (देवगड) आणि तृतीय क्रमांक श्री. संतोष पांचाळ (पडेल) यांनी मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिक सौ. पूजा गोसावी (ओरस) यांना प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेसाठी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, शाखा आचरा यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास श्री. सुरेंद्र सकपाळ, सुरेश ठाकूर सर तसेच रॉयल मालवणी, सिंधुदुर्गचे अध्यक्ष डॉ. अभय परब, सेक्रेटरी डॉ. अमोल हूले, खजिनदार डॉ. स्वप्नील भोगटे व इतर सदस्य उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. राहुल पंतवालालकर आणि डॉ. निशा धुरी कोचरेकर यांनी उत्कृष्टपणे काम पाहिले. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. सिद्धेश सकपाळ व डॉ अमोल हुले यांनी प्रभावी शैलीत केले.
संगीतप्रेमींसाठी ही स्पर्धा एक संस्मरणीय अनुभव ठरली असून भविष्यातही अशा उपक्रमांची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

15/04/2026
रॉयल मालवणी सिंधुदुर्ग कडून आज 08 एप्रिल 2026 रोजी दिविजाश्रम असलदे येथे आजी आजोबा यांना डायपर भेट देण्यात आले. याप्रसंग...
08/04/2026

रॉयल मालवणी सिंधुदुर्ग कडून आज 08 एप्रिल 2026 रोजी दिविजाश्रम असलदे येथे आजी आजोबा यांना डायपर भेट देण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ अभय परब, उपाध्यक्ष डॉ सिद्धू सकपाळ, इतर पदाधिकारी, सौ प्रियांका सकपाळ व आश्रमाचे सचिव श्री संदेश शेट्ये सर उपस्थित होते.

रॉयल मालवणी सिंधुदुर्ग घेऊन येत आहोत......लवकरच.....
08/04/2026

रॉयल मालवणी सिंधुदुर्ग घेऊन येत आहोत......

लवकरच.....

Address

1188 Atharv House
Malvan
SINDHUDURG

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when रॉयल मालवणी कला क्रीडा आरोग्य Reg.No.F-0005468 SDD posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category