22/09/2022
मुंबई विद्यापीठ व आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बॅडमिंटन स्पर्धा संपन्न
मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभागाच्या बॅडमिंटन ( मुले व मुली) स्पर्धा देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख येथील डॉ. सुलभा आपटे क्रीडा संकुलमधील बॅडमिंटन कोर्टवर संपन्न झाल्या. या स्पर्धेत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयातून एकूण २२ मुलांच्या व १२ मुलींच्या संघानी सहभाग घेतला. सदर उद्घाटन समारंभ संस्था उपाध्यक्ष कुमार भोसले, कार्यवाह शिरीष फाटक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून डॉ. जयवंत माने, शशांक ऊपशेट्ये व सिंग यांच्यासह संगमेश्वर तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश प्रभुदेसाई व सहकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुलांच्या सांघिक गटामध्ये डी. बी.जे. कॉलेज, चिपळूण यांनी प्रथम क्रमांक, पिल्लाईज कॉलेज, पनवेल यांनी उपविजेतेपद पटकाविले तर पिल्लाईज इंजिनिअरिंग कॉलेज, पनवेल यांनी तिसरा क्रमांक पटकाविला. मुलींच्या सांघिक गटामध्ये एस.पी. हेगशेट्ये कॉलेज, रत्नागिरी यांनी प्रथम क्रमांक, एस. आर. एम. कॉलेज, कुडाळ यांनी उपविजेतेपद तर गोगटे- जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी यांनी तिसरा क्रमांक पटकाविला.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ.नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, संगमेश्वर बॅडमिंटन असोसिएशनचे मंगेश प्रभूदेसाई, दिलीप विंचू, हरेश पटेल, मोहन हजारे आदी पदाधिकारी, महाविद्यालयाच्या जिमखाना समितीमधील डॉ. अमित वराळे, प्रा. विकास शृंगारे, डॉ. राहुल ठोके, प्रा. चन्नया हिरेमठ, प्रा. सुदीप कांबळी, प्रा. पिया मोरे, प्रा. हेमांगी आग्रे, प्रा. शुभम डाफळे, क्रीडा शिक्षक प्रा. सागर पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, ॲड. वेदा प्रभुदेसाई यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.
फोटो:- १. बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक विद्यार्थी.
२. मुंबई विद्यापीठाच्या बॅडमिंटन अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंसोबत प्राचार्य डॉ. तेंडोलकर, श्री. प्रभूदेसाई, संगमेश्वर बॅडमिंटनचे
पदाधिकारी आणि प्राध्यापक.