03/01/2024
एलपीजे इनोव्हेशन ॲवार्ड्स- २०२४
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अन् शाळा व्यवस्थापनाच्या आग्रहास्तव लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप कला आणि क्रीडा आकादामीच्या वतीने आयोजित ‘‘एलपीजे इनोव्हेशन ॲवार्ड्स- २०२४ ’’ स्पर्धेत सहभागी होण्याकरिता दि. २६ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
शाळा-महाविद्यालयांना असलेल्या नाताळ व नववर्षाच्या सुट्टयांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व शाळांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थी व शाळांनी या संधीचे सोने करावे.
आपल्या नवकल्पना मांडा...सादर करा..अन् बक्षीसही मिळवा!
विद्यार्थी मित्रहो...चला तर मग...!
आपण तयार केलेला प्रकल्प, पी.पी.टी., व्हिडीओ, अथवा संकल्पना www.lpjfoundation.com या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून त्यावर सबमिट करावी. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा. (8956002507/ 8956002508 )
धन्यवाद!
Pimpri Chinchwad Municipal Corporation BJP Pimpri Chinchwad Shankar Jagtap Mauli Jagtap